Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्याय मिळाला नाही तर, रस्त्यावरची लढाई लढू : मनोज जरांगे

परभणी : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी बुधवारी बीड आणि परभणी येथील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलत

डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग
रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ
चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली

परभणी : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी बुधवारी बीड आणि परभणी येथील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे यांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही तर मराठेही आंदोलन उभे करतील. सूर्यवंशी कुटुंबीयांच्या मागण्या मान्य कराव्यात, आरोपींवर कारवाई करावी. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण उभे राहू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी दुपारी परभणी हिंसाचाराचा बळी ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात दोषी असणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करत पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. त्यांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्‍वसनाच्या आजारामु्ळे झाल्याचे विधानसभेत निवेदन केले. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या पार्श्‍वभूमीवर मनोज जरांगे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री व भावाशी संवाद साधला. त्यात पीडितांनी या प्रकरणात आपल्याला न्याय हवा असल्याची मागणी केली. यावेळी जरांगे यांनी त्यांचे सांत्वन करत प्रस्तुत प्रकरणात दोषी असणार्‍या पोलिसांवर तत्काळ बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचीही मागणी केली.

COMMENTS