31 डिसेंबरला गोंधळ घातल्यास कारवाईचा बडगा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

31 डिसेंबरला गोंधळ घातल्यास कारवाईचा बडगा

पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचा इशारा

यवतमाळ प्रतिनिधी- कडू-गोड आठवणीने सरत्या वर्षाला निरोप देवून जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांनी ‘थर्टी फस्ट’च्या पार्

पुण्याची संस्कृती बिघडवू नका भाजपाला इशारा (Video)
 साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली
जम्मू-काश्मिरात पुन्हा एका जवानाला वीरमरण

यवतमाळ प्रतिनिधी- कडू-गोड आठवणीने सरत्या वर्षाला निरोप देवून जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांनी ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीचा बेतही आखला आहे. हा उत्साह साजरा करीत असताना हुल्लडबाजी करणार्‍यांवर पोलिसांचा वॉच राहणार असून, कुठेही अनुचित प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिला आहे. नववर्षाचे स्वागत करताना कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून, फिक्स पॉईंट राहणार आहे. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केल्या जाईल. ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य राहणार आहे,अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.

COMMENTS