Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम बुद्धांच्या विचारांचे आचरण केल्यास जग सुखी होईल ः डॉ.प्रशांत गायकवाड

सातारा/प्रतिनिधी : ‘ बुद्ध धम्मावर अनेक आक्रमणे झाली तरी बुद्धांचा विचार जगात शाबूत राहिला आहे. बुद्ध धम्म हा प्रज्ञा ,शील ,करुणा ,मैत्री भावना य

व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरुन मेसेज, गाडीत बलात्कार | LOKNews24
विद्यार्थ्यांसाठी युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांचा वंडर ठाणे उपक्रम 
दुहेरी हत्याकांड: बापलेकाची निर्घुण हत्या | LOKNews24

सातारा/प्रतिनिधी : ‘ बुद्ध धम्मावर अनेक आक्रमणे झाली तरी बुद्धांचा विचार जगात शाबूत राहिला आहे. बुद्ध धम्म हा प्रज्ञा ,शील ,करुणा ,मैत्री भावना यावर स्थिर आहे. उच्च दर्जाची नैतिकता हा बुद्धांचा  धम्म आहे. बुद्ध धम्म  कोणतीही गोष्ट शाश्‍वत नाही असे सांगतो. दुःख ,अनित्यता,आणि अनात्मता  या बाबीविषयी  बुद्ध धम्म  सत्य सांगतो. अनित्यतेची जाणीव माणसाला शुद्ध बनवत असते. ‘आत्मा अमर आहे’हे  विचार बुद्धाना मान्य नाहीत. आज आपण कर्मकांड कोणते ते ओळखले पाहिजे. अनेकांना डिप्रेशन आलेले आहे. नोकरया नाहीत ,कौटुंबिक हिंसा वाढली आहे. टोकाचा द्वेष माणूस पसरवत आहे. याचे कारण माणसाचे आचरण बिघडले आहे. नितीमत्ता चांगली ठेवली पाहिजे. प्रज्ञेच्या  प्रकाशात सत्य समजून घ्यावे. मैत्री भावना वाढवली पाहिजे तर माणूस सुखी,समाधानी जीवन जगू शकेल. बुद्धांच्या विचारांचे आचरण केले तर सारे जग सुखी होईल’ असे विचार  विजयसिंह  यादव  महाविद्यालय पेठ वडगाव  येथील मराठी विभागातील  बुद्ध धम्माचे  संशोधक प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.
ते सातारा  येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ‘तथागत गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. नवीन शैक्षणिक धोरणाच्या असलेल्या  ‘भारतीय ज्ञान प्रणाली’विषयनुसार उच्चतर शिक्षा अभियान योजनेंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
    प्रारंभी विषय विवेचन करत असताना ते म्हणाले की’ प्रत्येक देशाला तत्वज्ञानाची आवश्यकता असते. आपल्या देशात 9 दर्शने असून त्यातील सहा वैदिक तर तीन अवैदिक आहेत. तत्वज्ञाने कितीही असली तरी माणसाला प्रत्यक्ष अनुभव काय येतो याला महत्व आहे. बुद्ध धम्माचे तत्वज्ञान मानव जातीचे कल्याण करणारे असून मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. सम्राट अशोकाने बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले. जनावरांना चारा छावण्या सुरु केल्या.पाणपोया,हजारो स्तूप त्यांनी बांधले. यज्ञात पशूना बळी देण्याचे त्यांनी बंद केले.  बुद्ध ऐतिहासिक कि काल्पनिक हा विषय जेंव्हा  विचारला गेला तेंव्हा पुरावा काय हा प्रश्‍न पडला होता. अशावेळी गौतम बुद्धांनी जिथे वास्तव्य केले होते तेथील शेतसारा माफ केल्याचे फलक सम्राट अशोकानी लावल्याचे उल्लेख आढळले. आणि मग गौतम बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ती आहे हे सिद्ध झाले.  पुढे नागवंशीय मौर्य राज्य, पुष्यमित्र श्रुंग याने घेतले. मनुस्मृती लागू झाल्यावर 45 वर्षात बौद्धांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आले. पुढे  20 व्या शतकात बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध वाड्मयाचे वाचन केले. 15 वर्षे पाली भाषेचा व्यासंग केला. त्यांनी पाली भाषेचे व्याकरण व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेब नसते तर वस्तुनिष्ठ  बुद्ध दिसले नसते. बुद्ध धम्म हा चिकित्सक धम्म आहे. चमत्कार ,ईश्‍वर आत्मा यांना त्यात स्थान नाही. धम्म ही नीती आहे. ती नैतिक जीवनशैली आहे. नीती म्हणजे सदाचार ,प्रज्ञा आणि करुणा ,अष्टांग मार्ग ,दशशील  हे विचार आचरणात आणावे लागतात. कोणी निंदा केली तरी निंदा ही स्वतःचा शोध घेण्याची संधी असते, बुद्धांनी  कोणताही कल्पनेवर आधारित धर्म न सांगता   माणसांचे व्यक्तिमत्व चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे असेही ते म्हणाले. प्रारंभी प्रास्ताविक प्रा.श्रीकांत भोकरे यांनी केले. व्याख्यान कार्यक्रमाच्या शेवटी  प्रथमेश हबले व प्रा. बाहुबली चौगुले  यांनी  प्रश्‍न विचारले त्यास प्रा.गायकवाड यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन तेजश्री कोरडे हिने केले. व आभार जान्हवी  चव्हाण हिने मानले.  या कार्यक्रमास लोकायत प्रकाशनचे प्रकाशक राकेश साळुंखे,प्रा.बाहुबली चौगुले, प्रा.दिपकराज शिंगे, कवी शंकर कांबळे,डॉ.कांचन नलवडे,प्रा.डॉ.विद्या नावडकर, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार, मराठी व समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

बुद्ध शांततेचा व मानवतेचा विचार ः डॉ. सुभाष वाघमारे – बुद्ध तत्वज्ञानाच्या बाबत बोलताना डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले ‘ज्याच्यावर प्रेम करतो ती गोष्ट शाश्‍वत नाही. अनित्यता समजून घेऊन समंजस वर्तन करावे. जन्माच्या अगोदर आणि मरणाच्यानंतरच्या आयुष्याचा आपण कसलाच विचार करू नये. वाईट कर्माची फळे वाईट मिळतात. बुद्ध शांततावादी आहे तो कधी आग लावत नाही. बुद्ध शांततेचा व मानवतेचा विचार आहे. काल आम्ही लेमनच्या गोळ्या खात होतो. आज आम्हाला पिस्तुल आणि गोळ्या दिसायला लागल्या, आपल्याकडे हिंसा वाढत चालत चालली आहे. विद्यार्थ्यांनी हिंसेच्या नादाला न लागता अहिंसेने आपले ध्येय साध्य करावे. धर्मांध व्यक्ती व त्यांचे भेदभाव करणारे विचार यांच्या नादी लागू नये. काळ कोणताही येवो  सर्वांचे कल्याण करण्यासाठी बुद्धाच्या विचाराची सार्‍या जगाला चिरंतन गरज असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS