दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे सुरु न केल्यास पालिकेच्या वीज कनेक्शनचा फ्युज घालविणार : गिरीश जाधव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे सुरु न केल्यास पालिकेच्या वीज कनेक्शनचा फ्युज घालविणार : गिरीश जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. हा रस्ता कायम अंधारात असतो. त्यामुळे पादचारी तसेच

साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद थोरात
गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे
निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या

अहमदनगर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. हा रस्ता कायम अंधारात असतो. त्यामुळे पादचारी तसेच दुचाकी चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. जर पालिकेने या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ पथदिवे सुरु केले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल व पालिकेच्या वीज जोडणीचा फ्युज काढून घेऊन पालिकेला देखील अंधारात ठेवले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.            या प्रश्ना संदर्भातील निवेदन गिरीश जाधव यांनी आयुक्त शंकर गोरे यांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे नगरसेवक व अन्य पदाधिकारी होते.            नगर शहरातील महत्वाचा आणि वर्दळीचा भाग असलेल्या दिल्लीगेट ते लालटाकी या तब्बल दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कायमस्वरूपी अंधार आहे. पालिकेच्या विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होते आहे. किंवा ते जाणूबुजन दुर्लक्ष करीत असावेत कारण पथदिवे दुरुस्ती देखभालीचा ठेका एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीला पालिकेला येणारे भरभक्कम  विजेचे कमी करून दाखविण्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणून की काय वीज बिल वाचविण्याच्या खटाटोपापायी हा ठेकेदार शहरातील अनेक भागातील पथदिव्यांची वीज आळीपाळीने घालावीत असावा . त्यामुळे निम्मे शहर कायम अंधारात असते.  शहरापासून जरा दूर असलेल्या उपनगरात तर कायमस्वरूपी अंधार असतो.  पालिकेने ठेका दिल्यानंतर नगर शहरातील सर्व पथदिवे बदलण्यात आले . त्यात देखील कमी क्षमतेचे दिवे बसवून घोटाळा करण्यात आला आहे. यामुळे पालिकेला या ठेकेदारानाने कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. त्यात नव्याने वसविण्यात आलेल्या पथदिव्यांचा प्रकाश पूर्ण क्षमतेने पडत नाहीत तसेच त्यातील बरेचशे दिवे खराब होऊन बंद पडले आहेत. ते तात्काळ बदलण्याची तसदी संबंधित ठेकेदार घेत नाही . एक तर सध्या भारनियमन सुरु असल्यामुळे नगरकर अंधारात चाचपडत आहेत. त्यात असा जाणूनबुजून वीज पुरवठा बंद ठेवल्याने नगरकरांना या रस्तावरुन गुडूप अंधारात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.             या रस्त्यावर विविध शाळा महाविद्यालये , खाजगी क्लासेस मोठ्या संख्येने आहेत. त्यात सध्या परीक्षांचे दिवस आहेत. नगर शहर उपनगरांना जोडणारा हा एक प्रमुख रस्ता आहे. शहरातून प्रवास करताना प्रत्येक नगरकराला दिवसातून किमान एकदा तरी या रस्त्यावरून जावेच लागते. त्यात रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने सक्कर चौक आणि आयुर्वेद कॉलेज पासूनची वाहतूक दिल्लीगेट मार्गे वळविण्यात येते. त्यात अवजड वाहतुकीचे कंटेनर, मालट्रक , टेम्पो तसेच एस टी आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या याच रस्त्यावरून रात्री जातात. रात्रीच्या वेळी कामे आटोपून घराकडे निघालेला वर्ग आणि पहाटे जॉगिंग साठी या रस्त्यावर आलेल्या मंडळींना पायी चालतांना आपल्या मोबाईल चा टॉर्च वापरून चालावे लागते. अवजड वाहतूक रात्री व पहाटे या रस्त्यावर असल्याने छोटे मोठे अपघात या रस्त्यावर नेहमीच होतात.          आयुक्तांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून या रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरु करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत अन्यथा पालिकेचे लाईट घालविण्याचे आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल अशा इशारा जाधव यांनी दिला आहे. 

COMMENTS