Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकालानंतर 48 तासांत सरकार न बनल्यास राष्ट्रपती राजवट अटळ : संजय राऊत

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील 48 तासांत सरकार स्थापन करावे लागणार आहे. नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणारा हा वेळ पुरेसा नाही. या काळात द

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया विरोधात कुस्तीपटूंचा निषेध
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक
Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील 48 तासांत सरकार स्थापन करावे लागणार आहे. नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणारा हा वेळ पुरेसा नाही. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागणार आहे. निकालानंतरच्या 48 तासांत सरकार बनले नाही, तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही, म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजपा आपले मनसुबे पूर्ण करीत आहे. अमित शाह व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे, असा एकंदरीत डाव दिसतं आहे.

COMMENTS