शहरटाकळी/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सविता वसंत पवार (शिंदे) यांना रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी या सेवाभा

शहरटाकळी/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सविता वसंत पवार (शिंदे) यांना रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे मनीष बाहेती, प्रदीप बोरुडे, संजय लड्डा, मनीषा लढ्ढा भारती बाहेती उपस्थित होते, श्रीमती सविता पवार या जिल्हा परिषद शाळा देहाडराय नगर येथे कार्यरत असून, शहरटाकळी च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच अलकाबाई शिंदे यांच्या त्या सुनबाई आहेत. श्रीमती सविता पवार यांच्या या पुरस्काराबद्दल शहरटाकळी व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
COMMENTS