पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद

अहमदनगर/प्रतिनिधी : स्वतः हार्मोनियमवर सूर लावत प्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेली व प्रसिद्ध पार्श्‍वगायक सुरेश वाडकर यांनी गायलेली ’पहाट

दक्षिण नगर जिल्ह्यातील रस्ते आता दुरुस्त होणार ; केंद्र सरकारने मंजूर केले 84 कोटी
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’
मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची नवोदयसाठी निवड

अहमदनगर/प्रतिनिधी : स्वतः हार्मोनियमवर सूर लावत प्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेली व प्रसिद्ध पार्श्‍वगायक सुरेश वाडकर यांनी गायलेली ’पहाटे पहाटे मला जाग आली..’ ही गझल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गायला सुरुवात केली आणि उपस्थित नगरकर संगीत रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद दिली. निमित्त होते-त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आयोजित गझल मैफिलीचे.
काळे तसे राजकारणी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांनी अचानकपणे एखाद्या व्यावसायिक गायकाप्रमाणे उत्तम सादर केलेल्या गझल गायनामुळे उपस्थितांनी त्यांना दाद दिली, पण त्यांच्यातील ही गायनकला अनेकांच्या भुवया उंचावून गेली. काळे यांनी तीन वर्ष प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्याकडे तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे या मैफिलीत काळे यांना उपस्थितांनी गायनाचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांनी देखील या आग्रहाला प्रतिसाद देत स्वतः हार्मोनियम हातात घेत सूर लावले व गझल सुरू केली, तेव्हा टाळ्यांची जोरदार दाद मिळाली. उपस्थितांच्या आग्रहाखातर अनेक दिवसांनंतर जाहीर कार्यक्रमातून आज गाण्याचा आनंद घेता आल्याची भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली.

रंजिश ही सही…
सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहामध्ये झालेल्या या गझल मैफिलीच्यावेळी औरंगाबादचे प्रसिद्ध गझल गायक डॉ. दोस्त मोहम्मद व गायिका आरती पाटणकर यांनी सादर केलेल्या गझलांना नगरकरांनी भरभरून दाद दिली. दोघांनीही अनेक नवोदित गझलकारांच्या रचना सादर केल्या. या रचनांना संगीतबद्ध करण्याचे काम डॉ.मोहम्मद यांनी केलेले आहे. यावेळी उपस्थितांच्या फर्माईशीवरून डॉ.मोहम्मद यांनी प्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन यांची लोकप्रिय ’रंजिश ही सही’ ही सादर केलेली गझल रसिकांची विशेष दाद मिळवून गेली.
तंजिम-ए-उर्द-अदबचे अध्यक्ष व काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांच्या पुढाकारातून या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त काळे युथ फाउंडेशनच्यावतीने शहरामध्ये पहिल्या किरण अहमदनगर फेस्टिवल 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल अंतर्गत शाम-ए-गझल ही मैफल रंगली. या मैफिलीत हार्मोनियम वर गजानन केचे, तबल्यावर संतोष केचे, शेर मोहम्मद खान, डॉ. मोहम्मद खान यांनी साथ केली. प्रास्ताविक सय्यद यांनी केले. यावेळी अशोक गुंजाळ, अनंत गारदे, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, प्रा. डॉ. बापूसाहेब चंदनशिवे, नूर सय्यद, निवृत्त प्राचार्य कादिर, मोहम्मद इक्बाल, निसार बागवान, आर्किटेक्ट सय्यद मोईन, नगरसेवक असिफ सुलतान, डॉ.रिजवान शेख, आरटीओ इन्स्पेक्टर शेळके, के.के.खान, खलील चौधरी, युनुसभाई तांबटकर, कवयित्री डॉ. कमर सुरूर, कवयित्री नफिसा आया, कवी सलीम यावर, कवी आबिद खान, जलील अमरवली, शाह चष्मावाला, आय. बी. शहा, शफी कविजंग जहागीरदार, मोहम्मद अकील, मुनवर हुसेन, अ‍ॅड. एस. बी. शेख उपस्थित होते.

COMMENTS