Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी पुन्हा येईन’, भाजपाने देवेंद्र फडणवीसांची कविता ट्वीट केल्यामुळे खळबळ

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येई

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
मुन्नाभाई आणि सर्किट १३ वर्षानंतर येणार एकत्र
चित्रपट प्रदर्शिनाआधीच निर्मात्याचे निधन  

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीसांचं विधान आणि त्यांच्या आवाजातील एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यामुळे भाजप पुन्हा राजकीय धक्का देणार? अशी चर्चा या ट्विटनंतर सुरू झाली. पण, नंतर भाजपकडूनच या व्हिडीओबद्दल खुलासा करण्यात आलाय.

‘मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीस २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना म्हणाले होते. मात्र, त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावर येता आलं नाही. तीन दिवस मुख्यमंत्री राहिल्यानंतर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण, भाजपकडून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. महाराष्ट्र भाजपच्या X (पूर्वीचं ट्विटर) हॅण्डलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन -देवेंद्र फडणवीस’, अशा ओळी व्हिडीओ शेअर करताना पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, या व्हिडीओवरून महाराष्ट्रात राजकीय तर्कविर्तक लावण्यास सुरूवात झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलले जाणार, अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडून याबद्दल अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या व्हिडीओबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते.

COMMENTS