निशिकांतची आजही मला आठवण येते

Homeताज्या बातम्यामनोरंजन

निशिकांतची आजही मला आठवण येते

व्हिडिओ शेअर करत जितेंद्र जोशी झाला भावुक

अभिनेता जितेंद्र जोशीने( Jitendra Joshi)  नुकतीच सोशल मीडियावर 'गोदावरी' या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जितेंद्र जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर

संगमनेरात परराज्यातील 69 लाखांची दारू जप्त
दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
खतरों के खिलाडी 13′ मध्ये कुत्र्याचा हल्लाने अभिनेत्री जखमी

अभिनेता जितेंद्र जोशीने( Jitendra Joshi)  नुकतीच सोशल मीडियावर ‘गोदावरी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जितेंद्र जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो सदर केला आहे. जितेंद्र जोशीनं आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, ‘जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो.आजही मला त्याची आठवण येत आहे’.

COMMENTS