Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू

लातुरातील अंबाजोगाई रोडवरील घटना

लातूर प्रतिनिधी - शहरातील एका नातेवाइकाकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आजी, मावशी, नातेवाइकांसोबत आलेल्या एका 11 वर्षीय मुलीचा हॉटेलच्या दुसर्‍या मजल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्कीटचे आयोजन : मंत्री शंभूराज देसाई
लातुरात 78 बँक कर्मचार्‍यांनी केले रक्तदान
बारावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

लातूर प्रतिनिधी – शहरातील एका नातेवाइकाकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आजी, मावशी, नातेवाइकांसोबत आलेल्या एका 11 वर्षीय मुलीचा हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंजीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी, नातेवाइकांनी अंबाजोगाईला रोडवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोलपल्यानंतर काही नातेवाईक हॉटेलमध्ये थांबले होते. दुसर्‍या मजल्यावरील खिडकीत बसलेली आद्या विनीत देशपांडे (वय 11, रा. हैदराबाद) ही अचानक खाली जमिनीवर कोसळली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांना मिळल्यानंतर पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनातून जखमी मुलीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने पाठवून दिले. तेथील डॉक्टरांनी जखमी मुलीला मृत घोषित केले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले करत आहेत.

COMMENTS