मुंबई प्रतिनिधी - पतीचे परस्त्रीशी असलेल्या संबंध मधून एका महिलेने तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून पतीच्या प्रियसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कुर्
मुंबई प्रतिनिधी – पतीचे परस्त्रीशी असलेल्या संबंध मधून एका महिलेने तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून पतीच्या प्रियसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कुर्ला येथील बंटर भवन समोरील नाल्यात एका गोणीत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन मध्ये या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह गोणीत भरून गोणी नाल्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. या बाबत नेहरूनगर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केलीं असता दोन महिलांनी रिक्षातून ही गोणी आणल्याचे समोर आले. रिक्षा चालकाचा शोध लागताच या सर्व प्रकरणाचा उलघडा झाला. मिनल पवार हिचे पतीचे मयत महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्याचा राग मनात धरून मिनल पवार हिने तिची बहिण शिल्पा आणि मैत्रीण डॉली भालेराव यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या प्रकरणी चोवीस तासात तपास करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली आहे.

COMMENTS