Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरीजवळील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड महामार्गावर सेल पेट्रोल पंपसमोर एकेरी वाहतूक सुरू असल्या कारणाने अल्टो कार व माल वाहतूक ट्रक चा

बकरी ईद निमित्त नगर येथे मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण केले
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा
..तर मग, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे मानधन बंद करा…

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड महामार्गावर सेल पेट्रोल पंपसमोर एकेरी वाहतूक सुरू असल्या कारणाने अल्टो कार व माल वाहतूक ट्रक चा सामोरा समोर भीषण अपघात झाल्याने ममदापूर तालुका राहता येथील पती पत्नी जागीच ठार झाले. महामार्ग धिम्या गतीने सुरु असलेली दुरुस्तीमुळे पुन्हा एकदा या मार्गाने पती पत्नीचा बळी घेतला आहे. ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डीकडून नगर कडे दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे मेहुण्याच्या दशक्रियाविधीसाठी जात असताना अल्टो कार एमएच 14 ऐव्ही 3372 ला नगरकडून शिर्डी कडे जात असणार्‍या माल वाहतूक ट्रक केऐ 01 ऐएन 5697 ने समोरून जोराची धडक दिली असता अल्टो कार मधील दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे दोघेही राहणार ममदापूर तालुका राहता हे दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

COMMENTS