Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवीदोद्दीन सिद्दिकी यांचे दोन दिवसीय उपोषण

बीड । प्रतिनिधीमाजलगाव नगरपरिषद नामांतरण व गुंठेवारी विभागातील कथित भ्रष्टाचार, माजलगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील गैरप्रकार तसेच निलंबित

जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू
जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा
पेन्शनधारकांचे आज उपोषण

बीड । प्रतिनिधी
माजलगाव नगरपरिषद नामांतरण व गुंठेवारी विभागातील कथित भ्रष्टाचार, माजलगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील गैरप्रकार तसेच निलंबित स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय उपोषण केले.
उपोषणादरम्यान सिद्दिकी यांनी आरोप केला की, माजलगाव नगरपरिषदेत गुंठेवारी व नामांतरण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. बोगस गुंठेवारी, बनावट नामांतरण खरेदीखत तयार करणे, मुख्याधिकार्‍यांच्या बनावट सह्यांचा वापर करून एकाच पावतीवर अनेक गुंठेवारी नकाशे तयार करणे असे प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित लिपिक व इतर अधिकार्‍यांनी मिलीभगत करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा दावा करण्यात आला. तसेच माजलगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातही भ्रष्टाचार सुरू असून निलंबित स्वस्त धान्य दुकानाचे संचालक शासनाकडून गोरगरिबांसाठी येणारे धान्य काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे अनेक गरजू व गरीब राशन कार्डधारक धान्यापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर दोषींवर कडक कारवाई करावी, गोरगरिबांसाठी येणारे धान्य त्यांना नियमित मिळावे, तसेच पीएचएच (झकक) योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री करून बारा अंकी आरसी नंबरची ई-प्रिंट उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या उपोषणादरम्यान करण्यात आल्या. या आंदोलनावेळी नवीदोद्दीन सिद्दिकी यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

COMMENTS