Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ शेतकरी बसले आमरण उपोषणाला

  जालना प्रतिनिधी - शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी एकरी १० हजार रूपये देण्याचा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी राज्य सरकारला केलेली शिफारस तात्क

घोडच्या आवर्तनासाठी ग्रामस्थ व पाणी वापर संस्थेचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा
जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा
जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू

  जालना प्रतिनिधी – शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी एकरी १० हजार रूपये देण्याचा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी राज्य सरकारला केलेली शिफारस तात्काळ मंजुर करावी. अतिवृष्टीमुळे मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. नुकसाभरपाई पोटी शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र ८ महिने होऊनही हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही. हे अनुदान तात्काळ वाटप करा, तलाठ्याने प्रलंबित ठेवलेले शेतजमिनीचे शेकडो फेर तात्काळ मंजूर करावे. अंबिया बहराचा मंजूर फळपीक विमा तात्काळ खात्यावर जमा करावा. आदी मागण्यांसाठी शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.

COMMENTS