Homeताज्या बातम्यासंपादकीय

बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !

मनुस्मृतीतील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात लावले जातील, अशा सूचना निघाल्यानंतर, त्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड मोठे वातावरण निर्माण झाले. डॉ. ब

गांधींच्या खुन्याचा जयजयकार?
निम्मे पदवीधर भारतात बेरोजगार! 
…तर, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील!

मनुस्मृतीतील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात लावले जातील, अशा सूचना निघाल्यानंतर, त्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड मोठे वातावरण निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति जाळली तेव्हाच, मनुस्मृतीचे अस्तित्व या देशातून संपून गेलेले आहे! परंतु, काही संस्कृतींना पुन्हा मनूची संस्कृती जिवंत करून, या देशामध्ये विषमतेची पेरणी करायची आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या  कायद्याचे या पुस्तकालाच जाळून भस्म केले; त्याचवेळी, मनुच्या समर्थकांनी हा इशारा लक्षात घ्यायला हवा होता की, यापुढे मनुवादी राज्य आणि मनुस्मृती या दोघेही संपुष्टात आल्या आहेत!  सत्तेच्या आधाराने मनुस्मृति शालेय मुलांच्या अभ्यासक्रमात लागू करण्याची हिम्मत आणि तशी चर्चा राज्यामध्ये घडवून आणण्याचे षडयंत्र ज्यांनी घडवले, तेच आता जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचे दहन आणि त्यांच्या पुतळ्यांना जोडा मारो आंदोलन करीत आहेत. वास्तविक, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू केली जाते आहे, अशी सूचना आणि अध्यादेश आल्याबरोबर ज्या लोकांनी आंदोलनाचा ‘आ’ सुद्धा उच्चारला नाही, ते लोक जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केल्याच्या रागाने, आता रस्त्यावर उतरले आहेत. वास्तविक, ही सगळी दांभिक मंडळी आहेत. मनुस्मृतीचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा, काल रस्त्यावर उतरलेली ही मंडळी नेमकी बिळात घुसलेली असते का? जेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये अनावधानाने जे काही घडले असेल त्याची त्यांनी जाहीर माफी मागितली. माफी मागितल्यानंतरही जे लोक त्यांच्या विरोधात आंदोलनात उतरले आहेत किंवा आंदोलन करत आहेत,

ते सगळे मनुवादी आहेण.  मनु जे श्लोक अभ्यासक्रमात लागू करण्यासाठी एवढ्या दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेत हे लोक कधीच विरोधात उतरले नाहीत. परंतु केवळ जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला विरोध करण्यासाठी ही मंडळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. खरे तर एक बाब निश्चितपणे सांगावी लागेल की मनुस्मृतीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी ऐतिहासिक भूमिका  वठवली आहे, त्यानंतर मनुस्मृतीच्या दहनाचा कार्यक्रमाची गरज नाही! यापूर्वी देखील असे कार्यक्रम घेण्याचे साहस महाड येथे काही लोकांनी केले होते. त्यातही दुर्घटना घडल्या होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या मनुस्मृति कार्यक्रमात त्यांच्याकडून अनावधानाने जी चूक झाली, ती चूक हे दर्शवते की, मनुस्मृति दहनाचा कार्यक्रम किती गांभीर्याने घ्यायला हवा, त्यासाठी किती पूर्वतयारी हवी याचा त्यांनी कोणतेही नियोजन केलेले दिसलं नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी ज्या प्रमाणात पूर्वतयारी केलेली होती, ते पाहता अजूनही त्या पूर्वतयारीला तोड नाही. त्यामुळे मनुस्मृति दहन हा इव्हेंट चा कार्यक्रम नाही किंवा तो उतावळेपणाचाही कार्यक्रम नाही. त्याच्यामागे अतिशय वैचारिक आणि चिंतन आणि त्याचबरोबर परिवर्तनाचा सखोल विचार सामावलेला आहे. मनुस्मृतीच्या दहनासाठी जी पूर्वतयारी आवश्यक आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी करायला हवी होती!  ती त्यांनी न केल्यामुळेच त्यांच्याकडून अनावधानाने चूक झालेली आहे. त्यांच्या या अनुदानाने झालेल्या चुकीचे भांडवल मनुवादी करण्यापासून चुकले नाहीत; हाच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्यांच्या आंदोलनातून काढावयाचा निष्कर्ष आहे!

COMMENTS