राज्यातील विविध जिल्ह्यात गुरूवारी पूरस्थितीचा अनुभव अनेकांनी घेतला. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, अन्नासह म
राज्यातील विविध जिल्ह्यात गुरूवारी पूरस्थितीचा अनुभव अनेकांनी घेतला. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, अन्नासह मौल्यवान वस्तू पाण्यात वाहून गेल्या तर, शाळेचे कागदपत्रे, जात पडताळणी प्रमाणापत्रासह सर्वंच कागदपत्रे पाण्यात भिजून खराब झाल्यामुळे अनेकांनी टाहो फोडल्याचे चित्र होते. मात्र ही पूरस्थिती कशामुळे निर्माण होतांना दिसून येत आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. खरंतर मानवी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतांना दिसून येत आहे. भारताची लोकसंख्या 144 कोटींच्या घरात पोहोचली असतांना, भूभाग मात्र आहे, तेवढाच राहिल्याचे दिसून येते. प्रचंड लोकसंख्येमुळे आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर करतांना दिसून येत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपण निसर्गाचे चक्र बिघडणार नाही, तापमानवाढ मोठ्या प्रमाणावर होणार नाही, यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. भविष्यातील सर्वात मोठे आव्हान ग्लोबल वार्मिंगचे असणार आहे. मानव जंगलावर आक्रमण करत सुटला आहे. झाडे कापून घरे बांधतांना दिसून येत आहे. ती मानवाची गरज असली तरी, त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यासाठी गरज असतांना त्या नियोजनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. बरं शहर वसवत असतांना, किमान तेथील आराखडा योग्यपद्धतीने तयार करण्याची गरज आहे. कोणत्याही शहरात घरांना मंजूरी देण्याचे काम महापालिका करते. मात्र महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी भली मोठी लाच घेवून मंजुरी देत सुटले आहे.
परिणामी ओढ्या-नाल्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूररेषेमध्ये सुद्धा घरे बांधण्यात येत आहे. त्यामुळे मानव निसर्गावर आक्रमण करत सुटला आहे. त्यामुळे निसर्ग अतिवृष्टी करतो. तापमानवाढ त्याला कारणीभूत आहेच. शिवाय पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही जागा नसल्यामुळे थोडी अतिवृष्टी झाली की, तीन-तेरा वाजतात. शिवाय प्रशासनांमध्ये समन्वय नावाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. शहरामध्य अतिवृष्टी होत असतांना, आपत्तीच्या परिस्थितीत महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून या आपत्तीतून मार्ग काढण्याची गरज आहे. मात्र तो समन्वय पुण्यात दिसून आला नाही. त्यातच खडकावासल्यातून पाणी सोडण्यात आले. खरंतर अतिवृष्टी होणार आहे, त्याचा इशारा हवामान विभाग काही तास अगोदर देतांना दिसून येत आहे. त्यामुळे हवामान विभाग अद्यावत झाले असतांना, प्रशासन अजूनही अद्यावत झाल्याचे दिसून येत नाही. खरंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्याअगोदर जनतेला पूर्वसूचना देण्याची गरज होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नागरिक गाफील असतांना त्यांच्यावर या संकटावर मात करण्याची नामुष्की प्रशासनामुळे ओढवली. भारतासारख्या देशामध्ये सुसज्ज्ज आणि उत्कृष्ट नागरी व्यवस्थापन असणारी शहरे वसवण्याची खरी गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. शहराचा आराखडा बनवण्यात अपयश येतांना दिसून येत आहे. जिथे पाहिजे असेल तिथे बांधकामाला परवानगी देण्यात येत आहे. परिणामी मानव निसर्गावर आक्रमक करतांना दिसून येत आहे, आणि त्याला प्रशासन साथ देतांना दिसून येत आहे. खरंतर पुण्यामध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली ती काही प्रमाणात मुंबई, रायगड, गडचिरोली या जिल्ह्यात देखील निर्माण झाली. पुणे, ठाणे, पालघर, सातारा या जिल्ह्यात दोन दिवस शाळांना सुटी द्यावी लागली. त्यामुळे आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे नेहमीच तीनतेरा वाजतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही, यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पूररेषा पुन्हा नव्याने आखावी लागणार आहे, पूररेषेत असणारी घरे, पुन्हा एकदा दुसरीकडे स्थलांतरीत करावी लागणार आहे, तरच पूरस्थिती आपण गांभीर्याने हाताळू शकतो, अन्यथा परत पुढील वर्षी तीच परिस्थिती.
COMMENTS