Homeमहाराष्ट्रअहमदनगर

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी 

सोनई : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत शनीदेवांच्या दर्शनाने व्हावे, या भावनेतून शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशभरातून दररोज लाखो भाविक शनीदेवाच्या दर्शनासाठी येत असून, नाताळच्या सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरमध्ये अक्षरशः गर्दीचा महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी गर्दी होती  व गुरुवारी देखील शनीदर्शनासाठी प्रचंड गर्दी राहण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूरमधील खाजगी वाहनतळ तसेच देवस्थानचे वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरले असून, पार्किंग व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. देवस्थान प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे. सर्व विभागप्रमुख आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देत असून, मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.  दरम्यान, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले तसेच हरियाणाचे कालिदास महाराज यांनी सोमवारी शनिशिंगणापूर येथे शनीदर्शन घेतले. गोगावले यांनी सपत्नीक उदासी महाराज मठात शनीदेवाचा अभिषेक केला व त्यानंतर शनीमूर्तीवर तेल अर्पण केले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला.  यावेळी बोलताना   गोगावले यांनी सांगितले की, शनी महाराजांच्या दर्शनासाठी ते दरवर्षी येत असून, दर्शनानंतर मनाला मोठे समाधान मिळते. याप्रसंगी विभागीय कृषी आयुक्त प्रवीण गोसावी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, पोलीस पाटील सयाराम बानकर व सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके उपस्थित होते.  दरम्यान गुरुवारी १ जानेवारीला देखील प्रचंड गर्दी याठकाणी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या अन नववर्षाची सुरवात यामुळे लाखो भाविक या ठिकाणी आतापर्यंत दर्शन घेऊन गेले आहेत. गुरुवारीही दिवसभरात लाखभर भाविक दर्शनाला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नववर्षाचे स्वागत करताना!
देशभरात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळे फुलले

सोनई : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत शनीदेवांच्या दर्शनाने व्हावे, या भावनेतून शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशभरातून दररोज लाखो भाविक शनीदेवाच्या दर्शनासाठी येत असून, नाताळच्या सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरमध्ये अक्षरशः गर्दीचा महापूर आला आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी गर्दी होती  व गुरुवारी देखील शनीदर्शनासाठी प्रचंड गर्दी राहण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूरमधील खाजगी वाहनतळ तसेच देवस्थानचे वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरले असून, पार्किंग व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. देवस्थान प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे. सर्व विभागप्रमुख आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देत असून, मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

 दरम्यान, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले तसेच हरियाणाचे कालिदास महाराज यांनी सोमवारी शनिशिंगणापूर येथे शनीदर्शन घेतले. गोगावले यांनी सपत्नीक उदासी महाराज मठात शनीदेवाचा अभिषेक केला व त्यानंतर शनीमूर्तीवर तेल अर्पण केले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला.

 यावेळी बोलताना   गोगावले यांनी सांगितले की, शनी महाराजांच्या दर्शनासाठी ते दरवर्षी येत असून, दर्शनानंतर मनाला मोठे समाधान मिळते. याप्रसंगी विभागीय कृषी आयुक्त प्रवीण गोसावी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, पोलीस पाटील सयाराम बानकर व सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके उपस्थित होते.

 दरम्यान गुरुवारी १ जानेवारीला देखील प्रचंड गर्दी याठकाणी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या अन नववर्षाची सुरवात यामुळे लाखो भाविक या ठिकाणी आतापर्यंत दर्शन घेऊन गेले आहेत. गुरुवारीही दिवसभरात लाखभर भाविक दर्शनाला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS