निम्मा भारत झाला लसवंत ; 127 कोटींहून अधिक लोकांना लस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निम्मा भारत झाला लसवंत ; 127 कोटींहून अधिक लोकांना लस

नवी दिल्ली ः भारतात ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली असतांनाच, एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. देशात पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी

4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्रा चा तडफडून मृत्यू;पाहा VIDEO | LokNews24
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील कॅफे मालकाला अटक
ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली चोरी

नवी दिल्ली ः भारतात ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली असतांनाच, एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. देशात पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे.
भारताच्या या लसीकरण मोहिमेने हा एक मैलाचा दगड गाठला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार देशात आतापर्यंत 127.61 कोटींहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये 1 कोटी 4 लाख 18 हजार 707 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 127.61 कोटी डोस दिले गेले आहेत. दरम्यान, पुढे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की,’काल(4 डिसें.)देशात 1 कोटीहून अधिक डोस देण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विटरवर लिहिले, पात्र लोकसंख्येपैकी 50 टक्के पेक्षा जास्त लोकांचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे. हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. करोना विरुद्धची लढाई आपण एकत्र जिंकू. देशात कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रानंतर ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यामुळे लसीकरण मोठया प्रमाणावर वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र आता ओमायक्रॉनचा व्हेरियंट आढळून आल्यानंतर या लसीकरणाला पुन्हा वेग आला असून, देशातील निम्मी लोकसंख्या लसवंत झाली आहे. दरम्यान, रविवारी बिलासपूर येथील ऑल-इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे कोरोना काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी लसीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या कर्मचार्‍यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

हिमाचल प्रदेश ठरले पूर्ण लसीकरण झालेले पहिले राज्य
देशात कोरोनाविरुद्ध 100 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने दावा केला आहे. राज्यात तब्बल 53,86,393 पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र 100 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS