भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

Homeताज्या बातम्यादेश

भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री (Gujarat new Cm) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)
मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी… ‘या’ पक्षात केला प्रवेश
ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…

गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री (Gujarat new Cm) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील’, असं म्हटलंय.

COMMENTS