मुंबई प्रतिनिधी -बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आजवर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट क
मुंबई प्रतिनिधी –बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आजवर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक आणि सबाची जोडी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टवरुन ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सबा आझादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे,”तुमचा प्रसुतीरोगतज्ज्ञ कोण आहे?”. पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,”मी सध्या फक्त याच गोष्टीचा विचार करत आहे”. सबा आझादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी सबा आझाद प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. सबा आझादची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्युनिअर हृतिक येणारे का? आधी लग्न करा मग प्रसुतीरोगतज्ज्ञाचा शोध घ्या, अशा पद्धतीच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सबा आझादची ही पोस्ट सुजैन खान आणि हृतिक रोशनला चाहते टॅग करत आहेत.
COMMENTS