Homeताज्या बातम्यामनोरंजन

हृतिक रोशन आणि सबा आझादचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल

मुंबई प्रतिनिधी - अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद बॉलिवूडमधील चर्चित कपलपैकी एक कपल आहे. दोघे सातत्यानं एकत्र स्पॉट होत असतात. दोघांना अनेक वे

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली
रवी राणाला फुटाण्यासारखं फोडेन
शेतकर्‍यांसाठी शरद पवारांनी काय केलं ?  

मुंबई प्रतिनिधी – अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद बॉलिवूडमधील चर्चित कपलपैकी एक कपल आहे. दोघे सातत्यानं एकत्र स्पॉट होत असतात. दोघांना अनेक वेळा डिनर डेट आणि मुव्ही डेटला जाताना स्पॉट केलं जातं. अनेक पार्ट्यांमध्ये दोघे एकत्र दिसतात. दोघांनी आजपर्यंत कधीच त्यांच्या नात्याबद्दल कबूली दिलेली नाही. पण नुकताच ऋतिक आणि सबा यांचा एक प्रायव्हेट व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ऋतिक रोशननं पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तो सबला डेट करतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनं दोघांचं रिलेशन कन्फर्म झालं आहे. ऋतिक आणि सबा यांना एअरपोर्टवरील प्रायव्हेट व्हिडीओ समोर आला आहे. एअरपोर्टवर ऋतिकला स्पॉट करण्यासाठी फोटोग्राफर्स गोळा झाले होते. तेव्हा कार्गो पॅन्ट, टी-शर्ट, गॉगल्स आणि कॅपमध्ये ऋतिक रोशनला स्पॉट करण्यात आलं. या लुकमध्ये तो फारच हँडसम दिसत होता. त्याच्याबरोबर सबा आझाद देखील होती. ऋतिक रोशन सध्या फाइटर सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ऋतिक रोशन पहिल्यांदा दीपिका पादुकोणबरोबर दिसणार आहे. दोघांनी आधीच सिनेमाच्या काश्मीर शेड्यूलचं शुटींग पूर्ण केलं आहे. काश्मीरचं शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर ऋतिक पुढच्या शुटींगसाठी निघाला. तेव्हा एअरपोर्टवर ऋतिकला ड्रॉप करण्यासाठी एअरपोर्टवर आली होती.

COMMENTS