पुरंदरेंचे उदात्तीकरणातून छत्रपतींचा अपमान, मावळा कसा खपवून घेतो ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुरंदरेंचे उदात्तीकरणातून छत्रपतींचा अपमान, मावळा कसा खपवून घेतो ?

छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणात स्पोर्ट झालेला महाराष्ट्रासमोर त्या बदनामीच सामील असलेल्या पुरंदरे यांच

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या साठी आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन
लातुरात बनावट नंबरप्लेटचा वापर; ऑटोचालकावर फसवणुकीचा गुन्हा
लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू

छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणात स्पोर्ट झालेला महाराष्ट्रासमोर त्या बदनामीच सामील असलेल्या पुरंदरे यांचे उदात्तीकरण जाहीरपणे करतांना महाराष्ट्र पुन्हा शांत राहतो ही या राज्याची शोकांतिका म्हणायची की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची फितुरी म्हणायची, हा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आ वासून उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी च्या रायगडावर आहे तो रायगड किल्ला अठराशे अठरा पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात राहिला होता. मात्र या काळात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी त्यांनी जनतेला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना माहिती दिली नाही. याउलट छत्रपतींच्या समाधीला अत्यंत दुरावस्थेत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे ब्रिटिश संशोधक आणि लेखक जेम्स डग्लस यांनी त्यांच्या लेखनात लिहून ठेवलेले आहे. जेम्स डग्लस यांनी तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रात लेखन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी विषयी माहिती दिली होती ती माहिती वाचून सन 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेण्याचा निश्चय केला. स्वतः महात्मा फुले यांनी त्या काळात जवळपास एक हजार तरुणांना सोबत घेऊन रायगडाकडे कूच केली आणि सलग चार ते पाच दिवस त्यांनी रायगडावर संशोधन मोहीम राबवून अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला शोधून काढले जी अत्यंत दुरावस्थेत होती. या समाधीला शोधून काढल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा रचण्याचा निश्चय महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे पत्रप्रपंच करून सातत्याने पाठपुरावा केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. अशा यातील कोणत्याही प्रवासात टिळक यांचा सहभाग दिसत नाही. महात्मा फुलेंच्या पत्रप्रपंच च्या नंतर ब्रिटिशांनी 1885 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं पुनर्बांधणी सुरू केली. मात्र या संधीचा लाभ घेणार नाही ते पुरोहित कसे अशा प्रवृत्तीने टिळकांनी १८९५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे निमित्त करून संपूर्ण भारतातून निधी गोळा केला जो निधी त्यांनी व्यक्तिगत वापरला. शिवाय चोरलेला निधी त्यांनी ज्या बँकेत ठेवला होता ती बँकच बुडाली आणि सोबत तो जमा केलेला निधी देखील वडाला असे टिळकांनी स्वतः जाहीर केले होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी अशी कोणताही संबंध नसलेल्या टिळकांचा समाधीचे संशोधक म्हणून राज ठाकरे जे बोलले करतात तो जागृत असलेल्या बहुजन समाजाच्या ऐतिहासिक ज्ञानावर पुरोहीतशाहीचा आघात आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही. शिवाय ज्या पुरंदरे यांनी जेम्स लेन याला माहिती पुरवण्याचा संपूर्ण महाराष्ट्राला संशयच नव्हे तर त्या जेम्स लेन च्या पुस्तकात पुरंदरे यांचे मानलेले आभार, हाच एक मोठा पुरावा असूनही त्या पुरंदरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या समोर केलेले उदात्तीकरण हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुन्हा एकदा अपमान घडवण्याचा प्रकार आहे असेच आम्हाला वाटते. राज ठाकरे यांची राजकीय अस्तित्व हे कुणाच्या फेरी आधारावर असतं हे आता दिवसेंदिवस सिद्ध होऊ लागले आहे तसे ते त्यांच्या कालच्या औरंगाबादच्या सभेत देखील सिद्ध झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चा खोटा इतिहास शरद पवार यांच्या राजकारणावर टीका आणि कालपर्यंत एकूणच भाजप आणि मोदी चे टीकाकार असणारे राज ठाकरे यांच्या एकूणच भाषणामध्ये कुठेही त्यांच्यावर टीकेचा उल्लेख नसणं म्हणजे राजकीय तटस्थता हरवल्याची किंवा कुणाच्या तरी बाजूने जाऊन त्यांनी ही सभा घेतल्याचे उदाहरण म्हणून आज लोकांना ते दिसायला लागले आहे. महाराष्ट्रातील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी राजे यांच्या विषयीचा इतिहास आज धडधडीत समोर असताना बहुजन समाजाने तो ज्या पद्धतीने वाचून काढला आहे ज्या पद्धतीने त्या इतिहासाचे निरसन, विश्लेषण आणि समजून घेण्याचं या महाराष्ट्रातील बहुजनांनी प्रयत्न केले तशी अन्य कोणी तसदी घेतली नाही, तरीही आमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा खोटा इतिहास सभांमधून धडधडीत सांगणे, ही मला वाटतं पुरोहितशाही व्यवस्थेचा आगाज आहे.

COMMENTS