Homeताज्या बातम्यासंपादकीय

आतून काँग्रेस कशी पोखरली ?

भाग -५

राजकारण हे असं क्षेत्र आहे, ज्यात विश्वास करणं नेहमी अंगलट येतं. राजकारणात आपल्या गुरूचेही पंख छाटण्याचे काम जर कोणी प्रथम करत असेल, तर तो शिष्य.

साहित्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला ! 
पिढीचे भान ठेवा!
विधानसभेत ‘तारीख पे तारीख’ तर ऍड. आंबेडकरांचा काॅंग्रेसला इशारा !

राजकारण हे असं क्षेत्र आहे, ज्यात विश्वास करणं नेहमी अंगलट येतं. राजकारणात आपल्या गुरूचेही पंख छाटण्याचे काम जर कोणी प्रथम करत असेल, तर तो शिष्य. ही बाब अलिकडच्या राजकारणात आपण अडवाणी-मोदी यांच्या संबंधातूनही आपल्याला दिसते. असो. राजकारणाचे हे पैलू सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणही समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. काॅंग्रेस दीर्घकाळ सत्ता उपभोगलेला देशातील एकमेव पक्ष. सत्तेवर कायम विराजमान राहणाऱ्या काॅंग्रेसमध्ये साहजिकच नेते देखील अधिक. नेत्यांच्या संख्या बाहुल्यामुळे अंतर्गत मतभेद उफाळून येण्याचेही प्रमाण मोठे. याच मतभेदांचा वचपा काढण्याचे ठिकाण म्हणजे निवडणूका. निवडणुकीत आपल्याशी मतभेद असलेला नेता आपल्या पक्षाचा असला तरी तो पक्ष संघटनेत आपल्यावर भारी पडू नये म्हणुन त्याला पाडण्याची रणनिती आखून, पाडायचं, हे सूत्र अवलंबल जातं. त्यामुळे असं नेहमीच म्हटलं जात असे की, काॅंग्रेसचा पराभव अन्य कोणी नव्हे, तर, काॅंग्रेसच त्यांचा पराभव करते. 

       शरद पवार यांनी १९९९ मध्ये काॅंग्रेस पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्रात काॅंग्रेसचे प्रमुख नेतृत्व म्हणून दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली. त्यामुळे, साहजिकच विलासराव देशमुख आणि काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले शरद पवार यांच्यात अघोषित द्वंद्व सुरू झाले. या द्वंदाचा परिणाम या दोघांनी एकमेकांना राजकीय शह देण्याचे सूत्र अवलंबले. विलासराव देशमुख यांना त्यांच्याच मतदार संघातून पराभूत करण्याचे छुपे प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे बोलले जाते. त्यातूनच देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत १९९५ मध्ये जनता दलाचे शिवाजीराव कव्हेकर यांना ताकद देऊन पराभव करण्यात आला. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीतही देशमुख यांना पराभूत करण्यात आले होते. देशमुखांना हे पराभव एवढे जिव्हारी लागले होते, त्यातून त्यांनी काही काळासाठी काॅंग्रेस पक्ष सोडला होता. अर्थात, १९९८ मध्ये लगेच ते पक्षात परतले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यातून ते मुत्सद्दी बनले. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी काॅंग्रेसची आघाडी साधून  त्यांनी सत्ता संचलन केले. परंतु, निवडणूका आल्या की, पुन्हा तेच. शरद पवार यांच्या राजकीय खेळीला उत्तर देण्यासाठी किंवा कमजोर करण्यासाठी विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरूध्द मदत करण्याचे छुपे तंत्र अवलबल्याचे आजही बोलले जाते. दुसऱ्या बाजूला देशमुख यांना मुख्यमंत्री पदाची हुलकावणी कशी मिळेल याचाही खेळ होत राहीला. कधी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर आणून शह दिला गेला तर कधी अशोकराव चव्हाण यांना. मात्र, देशमुख हे राजकीय सूड घेण्यात माहीर झाले होते. त्यामुळे, त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म मिळू दिली नाही. तर, विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्री गोपाल वर्मा यांच्यामुळे गेले. त्यांची जागा अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री होऊन भरून काढली. मात्र, अवघ्या काही महिन्यातच ‘आदर्श’ घोटाळा उकरून काढण्यात आला. या घोटाळ्यात अशोकराव चव्हाण यांना नाहक बळी पाडून त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. यामागे देशमुख यांचाच हात होता, असे त्यावेळी उघडपणे बोलले जायचे. थोडक्यात काय तर, काॅंग्रेस ही अशी अंतर्गत वाद आणि मतभेदांमुळे कमजोर करण्यात आली. त्यात काॅंग्रेसचे शिर्षस्थ नेते आणि काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते यांचा समान वाटा होता.

COMMENTS