Homeताज्या बातम्यामनोरंजन

श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला? पती बोनी कपूर यांनी 5 वर्षांनंतर केला खुलासा

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये आकस्मिक निधन झाले. श्रीदेवी यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच ना

मतदारांची नावे वगळण्याचा महायुतीचा रडीचा डाव : नाना पटोले
हकनाक बळी !
ओबीसी : अन्यायासाठी वापर आणि न्यायाची दिशा!

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये आकस्मिक निधन झाले. श्रीदेवी यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या मृत्यूवर त्यावेळी कोणालाच विश्वास बसत नव्हता. दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. श्रीदेवीच्या मृत्यूला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता तिचे पती बोनी कपूरने तब्बल ५ वर्षांनंतर श्रीदेवीच्या मृत्यू प्रकरणावर मौन सोडले आहे. त्यारात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

बोनी कपूर यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पत्नी श्रीदेवींच्या मृत्यूबद्दल बोलताना हा मृत्यू नैसर्गिक नसून अपघाती असल्याच सांगितले. बोनी यांनी सांगितले की, ‘मी अजूनही श्रीदेवीला खूप मिस करतो. कारण ती आज ते क्षण पाहण्यासाठी नाही जे तिला पाहायचे होते. मुलगी जान्हवी कपूरचे यश, धाकटी मुलगी खुशी कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण पाहायचे तिचे स्वप्न होते.’ बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘माझे सलग सहा चित्रपट साऊथमध्ये रिलीज झाले आहेत. सर्व हिट झाले आहेत. पण हे यश पाहण्यासाठी श्रीदेवी नाही हे दुखावते. म्हणूनच मी तिचा हा फोटो इथे लावला आहे. जेणे करून असे वाटेल की ती इथेच आहे.’ श्रीदेवीच्या निधनाबाबत बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी चौकशी केली जात असताना मी सुमारे २४ ते ४८ तास याबद्दल बोललो होतो.’ यावेळी बोनी यांनी त्यांच्या मौनामागचे कारण उघड केले आहे. ते म्हणाले की, ‘त्यांना तपास अधिकाऱ्यांनी तसे करण्यास सांगितले होते. कारण भारतीय मीडियाचा खूप दबाव होता. मी लाय डिटेक्टर चाचणी आणि इतर गोष्टींसह सर्व चाचण्या केल्या. त्यानंतर आलेल्या अहवालातही हा अपघाती मृत्यू असल्याचे म्हटले आहे.’

तसंच श्रीदेवींचं निधन झालं तेव्हा , त्या स्ट्रिक्ट डाएटवर होत्या, असंही बोनी यांनी सांगितलं. ‘ती डाएट म्हणून खूप वेळ उपाशी राहायची, जेवणात मीठ घेत नव्हती, त्यामुळं अनेकदा तिला भोवळ यायची, डोळ्यासमोर अंधार यायचा… , असंही बोनी यांनी सांगितलं. स्क्रिनवर छान दिसावं म्हणून ती हे सगळं करायची. माझं लग्न झाल्यापासून अनेकदा तिला ब्लॅकआउटचा त्रास झाला होता. डॉक्टरांनीही तिला अनेकदा लो बीपीचा त्रास असल्याचं सांगितलं होतं

COMMENTS