मुंबई : विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांनाच काँगे्रस नेते नाना पटोले यांनी रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? असा बोचरा सवाल नि
मुंबई : विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांनाच काँगे्रस नेते नाना पटोले यांनी रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? असा बोचरा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक आयोग सांगते. मतदान जास्त झाले असेल, तर त्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतील. निवडणूक आयोगाने त्या लागलेल्या लाईनचे आम्हाला व्हिडिओ द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच आयोगाने जी पारदर्शता पाळली पाहिजे ती पाळली नाही, असेही नाना पटोले म्हणाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद निवडणूक आयोगाने केली. तर रात्री 65. 2 टक्के मतदानाची नोंद आयोगाने केली. दुसर्या दिवशी 66 टक्के मतदाना झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 76 लाख मतांची वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी केला. मतदानाचे प्रमाण 7.50 टक्क्यांनी वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.
COMMENTS