आता हा ‘ सामना ‘ कसा रंगेल!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आता हा ‘ सामना ‘ कसा रंगेल!

महा विकास आघाडीच्या दोन शिल्पकारांपैकी एक असणारे आणि गेल्या अनेक महिन्यापासून भाजपशी थेट संघर्ष घेत असलेले शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत या

राखी मूर्ख नाही, फक्त तिची मुलांबद्दलची निवड वाईट” | LOKNews24
राज्यात रक्तपात घडवण्याचे काम सुरू ः पटोले
Maharashtra : कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? | LOKNews24

महा विकास आघाडीच्या दोन शिल्पकारांपैकी एक असणारे आणि गेल्या अनेक महिन्यापासून भाजपशी थेट संघर्ष घेत असलेले शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना अखेर ‌ईडीने अडकविण्यात धन्यता मानली. महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये प्रचंड संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून नवाब मलिक शिवसेनेकडून संजय राऊत यांनी आक्रमकपणे उत्तरे दिली आणि भाजपच्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपात घेरण्याचेही त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात ‌ईडीचा फास आवळला जाईल, असे संकेत खूप आधीच चर्चिले जात होते, आता ते वास्तवात आले आहेत. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनीही जोरदार पणे प्रसार माध्यमांच्या समोर येऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न चालविला आहे! ‘आमच्याकडे श्रमाच्या कमाईशिवाय इतर कोणतीही संपत्ती नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. परंतु ईडीने प्रत्यक्षात केलेली कारवाई ही संजय राऊत यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या चौकशीचा चा उपयोग ‌ईडीने केल्याचे दिसते आहे. पत्रा चाळीच्या संदर्भातील कारवाईच्या अनुषंगाने ईडी ची कारवाई संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. पत्रा चाळीच्या ६७२ भाडेकरूंच्या रहिवासी इमारती बांधण्यासाठी गुरुआशिष कंस्ट्रक्शन ला दिलेल्या जमिनीचा व्यवहार हा परस्पर झाल्याचा एक आरोप या चौकशीतून बाहेर आला आहे. अर्थात गुरूषा आशिष कन्स्ट्रक्शन्स हे संजय राऊत यांच्याशी थेट संबंधित नाही, तरीही, ही कारवाई त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने याकडे राजकीय पद्धतीनेच बघितले जात आहे. महा विकास आघाडीची मजबुती दिवसेंदिवस वाढत असताना भाजपच्या नेत्यांकडून पिढीच्या माध्यमातून महा विकास आघाडीच्या नेत्यांना घेरले जात आहे, असा आरोप सर्वसामान्यपणे चर्चेतून केला जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील ही कारवाई महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय घटनेकडे अतिशय संवेदनशील विषय म्हणून पाहिले जात आहे. भाविकास आघाडीतील नवाब मलिक आणि आता खासदार संजय राऊत यांच्या पर्यंत झालेली पोहोच ही खरे तर ईडीच्या कारवाईचा भाग असला तरी या कारवाई मागे राजकीय सूड भावना असल्याचेच अधिक बोलले जात आहे. महा विकास आघाडीतील गृहमंत्र्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची भूमिका नाराजीची आहे असा कालपरवाच विषय चर्चेला आला होता आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांची भेट ही झाली. या भेटीदरम्यान गृह विभागाकडील कार्यशैलीवर मुख्यमंत्री नाराज आहेत, असा काहीसा सूर होता; परंतु नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे तो सूर बदलला. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या अनुषंगाने होऊ घातलेला बदल आणि त्या चर्चेच्या दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने केलेली कारवाई यांचा काही परस्पर संबंध आहे काय, या बाबीही आता प्रकर्षाने चर्चेला आलेल्या आहेत. अर्थात संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अधिक आक्रमक पाऊल उचलते की, नेमकं काय भूमिका घेते, यासंदर्भात आता जनतेला औत्सुक्य लागलेले आहे. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप सातत्याने खासदार संजय राऊत हे लावत होते. ईडीच्या अनेक अधिकार्‍यांच्या विषयी नाव न घेता ते आम्ही ईडीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी जाहीर करू अशी आक्रमक भूमिकाही घेत होते. परंतु, आता ईडीने त्यांच्यापर्यंत कारवाईचे पावले नेल्यामुळे आता हा ‘ सामना ‘ कसा रंगेल हे पाहणेच इतरांच्या हाती आहे.

COMMENTS