इस्लामपूर / प्रतिनिधी : आपल्या आशिर्वादाने 35 वर्षे आमदार आणि त्यातील साडे सतरा वर्षे राज्यात मंत्री म्हणून काम केले. मात्र, इतक्या वर्षात एकही
इस्लामपूर / प्रतिनिधी : आपल्या आशिर्वादाने 35 वर्षे आमदार आणि त्यातील साडे सतरा वर्षे राज्यात मंत्री म्हणून काम केले. मात्र, इतक्या वर्षात एकही काम तुम्हाला मान खाली घालावे लागेल, असे माझ्या हातून झालेले नाही. उलट तुम्हाला अभिमान वाटेल, तुमची मान ताठ होईल असेच काम मी केले आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी बोरगाव येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. देशात व राज्यात 10 वर्षापासून तुमचे सरकार आहे, मग हिंदू खतरेमे कसा आला? असा सवालही त्यांनी केला.
आ. पाटील म्हणाले, आज युवकांच्या हाताला काम हवे आहे. महागाई, भ्रष्टाचार, महिलावरील अत्याचार असे कितीतरी प्रश्न असताना भाजपा कंटेंगे-बटेंगेची भाषा करत आहे. शेती मालाचे दर वाढविले, तर महागाई वाढते, ही या सरकारची मानसिकता आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. पवारसाहेब केंद्रात मंत्री असताना सन 2004 ते 2024 पर्यंत त्यांनी शेती मालाच्या आधारभूत किंमती वाढविल्याने ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेस गती आली होती. भाजपाच्या केंद्र सरकारला बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा टेकू असल्याने त्यांचे या दोन राज्यावर विशेष लक्ष आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसभेला त्यांचे 48 पैकी 31 उमेदवार पडल्याने आपल्या राज्याची त्यांची राजकीय गरज संपली आहे. महाराष्ट्र राज्यातील मोठे उद्योग व अनेक कार्यालये गुजरातला पळविली असल्याने गुजरात राज्य दरडोई उत्पन्नामध्ये आपल्या राज्यांपेक्षा पुढे गेला आहे. हे राज्य पुन्हा जातीयवादी पक्षांच्या हातात देणार का, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या बहुजन हिताच्या विचारांच्या माणसांच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास या विधानसभा निवसणुकीत घ्यायचा आहे.
आपणास राज्यात जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली, त्यावेळी आपण बोरगावसह तालुक्याच्या विकासाला गती दिली आहे. आज आपणास राज्याच्या राजकारणात चांगले दिवस आले आहेत. मी राज्यात प्रचारासाठी फिरत असताना आपण चांगला प्रचार केला आहे. विरोधक साम, दाम, देह, दंड, भेद आदी मार्गाचा अवलंब करत आहे. आपण स्वाभिमान व भागाच्या विकासाला प्राधान्य द्यावे.
यावेळी ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, संजय पाटील, ए. पी. पाटील, माजी सरपंच प्रकाश वाटेगावकर, उदय पाटील यांची ही भाषणे झाली.
COMMENTS