Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिकी विद्यालयात पदकं विजेत्या तायक्वांदो खेळाडूंचा मेडल्स, प्रमाणपत्र देऊन सन्मान

प्रा.डॉ.विनोदचंद्र पवार यांना निरोप

बीड प्रतिनिधी - राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी झालेले, विविध स्पर्धेतील पदकं विजेत्या खेळाडूंचा सन्मान व प्रा डॉ विनोदचंद्र पवार यांची पा

घाणबी येथे कोसळला विजेचा खांब; पाटण महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

बीड प्रतिनिधी – राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी झालेले, विविध स्पर्धेतील पदकं विजेत्या खेळाडूंचा सन्मान व प्रा डॉ विनोदचंद्र पवार यांची पाटोदा येथे पीव्हीपी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन सैनिकी विद्यालयात करण्यात आले होते, अशी माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए यांनी दिली.
रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सब जुनियर तायक्वांदो स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सैनिकी शाळेतील विद्यार्थी सुशीमराज रणखांबे व रमन डागले यांचा सत्कार शाळेकडून करण्यात आला. सैनिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डाके एस ए हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य सुरेंद्र कुटे , सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉ. विनोदचंद्र पवार, डॉ अविनाश बारगजे व प्रा. रवींद्र झोडगे यांची उपस्थिती लाभली. रमण डागले, ओम उबाळे, केतन जोगदंड, प्रज्वल भाकरे, महेश शिंदे, ओंकार वायफळकर , वरद काळे , प्रथमेश कोल्हे, सक्षम धीवर, सुशीमराज रणखांबे, महेश शिंदे व अविष्कार आमटे त्यांच्यासह इतर गुणवंत खेळाडूंचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश बारगजे यांनी केले. प्रमुख पाहुणे सुरेंद्र कुटे, डॉ विनोदचंद्र पवार व प्राचार्य डाके एस ए यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. प्रा. रवींद्र झोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बिभीषण किलमिसे यांनी केले.

COMMENTS