Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवानी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित

लातूर प्रतिनिधी - वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळयात शिवानी नीळकंठ स्वामी हिचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल

KARMALA : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टाकणार लाल माती (Video)
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रे हिचे जन्मभूमीत जंगी स्वागत

लातूर प्रतिनिधी – वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळयात शिवानी नीळकंठ स्वामी हिचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वीरशैव भवन, खंडोबा गल्ली येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवानी हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत 583 गुण घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिचा वैद्यकीय शिक्षणासाठी पहिल्याच यादीत क्रमांक लागला आहे.
अंबाजोगाई येथील श्री ष. ब्र. 108 गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र देऊन शिवणीचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वामी परिवारातील सर्व सदस्य, सत्कार सोहळा संयोजन समितीचे प्रमुख तुकाराम झुकले, अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, सचिव उमाकांत कोरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मंठाळे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS