Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवान क्षीरसागर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान क्षीरसागर यांना चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवुन सन्मा

देवळाली प्रवरात मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात
संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध
डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला

बेलापूर ः येथील बेलापूर एज्युकेशन संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान क्षीरसागर यांना चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे. भगवान क्षीरसागर यांना मुंबई तसेच पुणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धेत पहीला व दुसरा क्रमांक मिळालेला आहे. आज विवाह ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. विवाह समस्येबाबत सलग दीड वर्ष त्यांनी व्यंगचित्र मालीका विविध वृत्तपत्रामधून सादर केले. तसेच व्यसनमूक्तीवर हसत खेळत व्यसनमूक्ती हे सुमारे तीनशे वात्रटिका व व्यंगचित्र असलेले पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. भगवान क्षीरसागर यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल श्री संत शिरोमणी रोहीदास महाराज चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण हा पुरस्कार देवुन गौरविण्यात आहे. त्याबद्दल खासदार सदाशिव लोखंडे   माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, भास्करराव खंडागळे, सुनिल मुथा, देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार, किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS