Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब दहे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील डाऊन बुद्रुक येथील माजी उपसरपंच बाबासाहेब धर्माजीदहे यांना सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  व आदेश फाउंडेशन

महाराजा होळकरांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक ः विवेक कोल्हे
निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात
स्वनिर्मित पाऊलवाट नशीब बदलवते ःसुप्रिया कर्णिक

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील डाऊन बुद्रुक येथील माजी उपसरपंच बाबासाहेब धर्माजीदहे यांना सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार उत्कर्षताई रुपवते, सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल सोनवणे, सचिव सुनीता सोनवणे, आदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मोकळ, सचिव चंदु अहिरे, माजी शिक्षक उद्योजक विविध क्षेत्रातील सत्कारमूर्ती यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सन्मानपत्र ट्रॉफी देऊन दहे यांना गौरवण्यात आले. डाऊच बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपसरपंच असताना दहे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या आशीर्वादाने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कार्यकाळात गावात राबवल्या. याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल डाऊन बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS