Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे गुणवंताचा सन्मान

शिरसगाव ः येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे डॉ. रेणू प्रकाश जोशी, कु. मुग्धा संजय शेळके, अद्वैत संजय शेळके यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळ

अ‍ॅड. रश्मी कडू यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार
मनसेला भोंगाविरोधी भूमिकेमुळे गळती
भातकुडगाव फाटा कडकडीत बंद

शिरसगाव ः येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे डॉ. रेणू प्रकाश जोशी, कु. मुग्धा संजय शेळके, अद्वैत संजय शेळके यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या गुणवत्तापूर्ण यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
श्रीरामपूर येथील शिवाजीनगर मार्केट यार्ड भागातील शेळके हॉलमध्ये विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविणारे विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. रेणू प्रकाश जोशी यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत नायर मेडिकल महाविद्यालयातून एम. बी.बी.एस्. परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले. कु. मुग्धा संजय शेळके यांनी बनारस हिंदू विद्यापीठ अंतर्गत वाराणशी येथील आय.आय.टी. महाविद्यालयातून  बी.टेक. पदवी परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले तर चि.अद्वैत संजय शेळके यांनी अ‍ॅड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन स्कूलमधून सी.बी.एस.ई. बोर्डाच्या10 वी परीक्षेत93:80 गुण प्राप्त करून विद्यानिकेतन अकॅडमी शाळेत  प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल या गुणवंतांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्प, पुस्तके, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांचा परिचय करून दिला. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी काळे यांनी सन्मानचिन्ह मजकुराचे वाचन केले. माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. शिवाजी काळे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आजचे शिक्षण, सेवाभाव आणि कुटुंब संस्कार याविषयी मनोगत व्यक्त करून शेळके परिवाराचा सेवाभावी आदर्श आठवणी विशद केल्या.. कु. मुग्धा शेळके आणि अद्वैत शेळके यांनी आपल्या मनोगतातून कुटुंबातील सर्वांचे सहकार्य, शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शनआणि मनापासून केलेला अभ्यास यामुळेच परीक्षेत चांगले यश मिळाल्याचे सांगितले. डॉ. अर्चना शेळके यांनी नियोजन केले. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.संजय शेळके समारोप मनोगतात म्हणाले, असे सत्कार म्हणजे आपल्या कार्यातून, सेवेतून सामाजिक जाणिवा जोपासण्याचा मान्यवरांनी दिलेला  हा संदेश लक्षात घेऊन वाटचालं केली पाहिजे. तुम्ही किती माणुसकी जपली एवढेच लोकांच्या लक्षात राहते, हे मनीध्यानी ठेवून वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

COMMENTS