नांदेडमध्ये ऑनर किलिंग , मुलीचा खून करून राख विसर्जित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नांदेडमध्ये ऑनर किलिंग , मुलीचा खून करून राख विसर्जित

नांदेड प्रतिनिधी-  नांदेड मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आप

लातूरातील 13 शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण
पाटण तालुक्याचा सुपूत्र कमांडो सुरज शेवाळे याने फडकविला 22 हजार फुटांवर तिरंगा
गाडीला कट मारून तिघांकडून दोघांना मारहाण, एकास पकडले

नांदेड प्रतिनिधी-  नांदेड मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खुन करून प्रेत जाळले. 23 वर्षीय शुभांगी  ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती.  गावातील तरूणासोबत तीचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते.  त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना काही कारणांमुळे आठ दिवसापूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगी च्या कुटुंबीयांना राग अनावर झाला. मुलींमुळे गावात बदनामी झाली या कारणाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राख देखिल बाजूच्या ओढ्यात टाकून दिली. 

तीन दिवसापासुन मुलगी गावात दिसत नसल्याची  माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली.पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलीसानी मुलीच्या वडील, मामा, भाऊ आणि काकाची दोन मुलं  अश्या पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

COMMENTS