Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फेसबुकवरील मैत्रीतुन जामखेडला हँनिट्रॅप  

महिलेसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल एकाला अटक

जामखेड प्रतिनिधी - हँनिट्रँपचे लोन ग्रामीण भागातही पोहचले आहे.  जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथील एका महिलेने फेसबुक वरून मैत्री करत अहमदपूर जि ल

ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज : पद्माकांत कुदळे
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला
नवोदय विद्यालयात आढळले आणखी 12 कोरोना बाधीत

जामखेड प्रतिनिधी – हँनिट्रँपचे लोन ग्रामीण भागातही पोहचले आहे.  जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथील एका महिलेने फेसबुक वरून मैत्री करत अहमदपूर जि लातुर येथील एका ट्रक ड्रायव्हरला प्रेमाच्या गप्पा मारत जाळ्यात अडवुन घरी बोलावून नातेवाईकाच्या संगनमताने हँनिट्रप केला.याबाबत महिलेसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. 

 सदर घटनेत महिलेने फेसबुकवर फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवली.आपला फोन नंबर देऊन प्रेमाच्या गप्पा मारत जाळ्यात अडकवत आपल्या घरी बोलावले. ड्रायव्हर प्रेमाच्या जाळ्यात अडकून नान्नज येथे बोलावले तेथून चोभेवाडी शिवारात राहते असे सांगून चोभेवाडीला महिलेच्या घरी आणले. तेव्हा महिलेने नातेवाईकांच्या संगनमताने सदर ड्रायव्हरला लाठी-काठीने मारहाण करुन पैशाची मागणी केली. तसेच त्याच्याबरोबर अर्धनग्न अवस्थेत व जबरदस्तीने फोटो काढले. पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करील अशी धमकी दिली. त्यामुळे सदर ड्रायव्हरने घाबरुन आरोपींना काही पैसे दिले. मात्र त्यांची पैशाची भुक वाढल्याने ड्रायव्हरची पत्नी व इतर नातेवाईकांना ड्रायव्हरच्याच मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करीत होते. दरम्यान सदर पिडित ड्रायव्हरच्या पत्नीने  १२ नंबरवर कॉल केला. पोलीसांनी ड्रायव्हरच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला व सविस्तर चौकशी करत तपास लावला 

ड्रायवर शरद बालाजी पाटील (वय ३५)रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर ड्रायव्हर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन चंदन काळे, सचिन काळे, सारिका काळे, किरण काळे यांच्याविरुद्ध गु.र.नं. व कलम :- 200/2023भादवि कलम 386, 388, 342, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक केली असून इतरांचा शोध जामखेड पोलिस घेत आहेत. 

COMMENTS