मुंबई ः घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढत असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 17
मुंबई ः घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढत असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 17 वर पोहचली होती. अनेकजण गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर येथे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 50 तास उलटून गेले. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अजून बरेच जण आणि वाहने ढिगार्याखाली अडकली आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी भलंमोठं होर्डिंग कोसळले. वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक हे होर्डिंग कोसळले आणि पेट्रोल पंपावर असलेली वाहनं आणि अनेक जण याखाली अडकले. या दुर्घटनेला होऊन 50 तास झाले. सकाळपर्यंत या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृताचा आकडा वाढून 17 वर गेला आहे. आणखी काही जण ढिगार्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर अजून देखील एनडीआरएफ आणि महापालिका आपत्ती सेवा, अग्निशमन दलांकडून बचाव कार्य सुरू आहे. तर आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले आहे. 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने या ढिगार्याखालून काढण्यात आले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी एक जोडपे आणि एक वाहन चालक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेतील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
COMMENTS