हिवरेबाजार वाचवणार 8 कोटी 36 लाख लिटर पाणी…; नववर्षदिनी मांडला पाण्याचा ताळेबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवरेबाजार वाचवणार 8 कोटी 36 लाख लिटर पाणी…; नववर्षदिनी मांडला पाण्याचा ताळेबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार यावर्षी तब्बल 8 कोटी 36 लाख लिटर पाणी वाचवणार आहे. मागील पावसाळ्यात गावात 512 कोटी 84 लाख लिट

शासनाचे पैसे रखडले…गावकर्‍यांनी दिले उसने…; हिवरे बाजारने लावली अखेर विकास कामे मार्गी
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे
अंगणवाडी सेविकांचे राज्यस्तरीय आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार यावर्षी तब्बल 8 कोटी 36 लाख लिटर पाणी वाचवणार आहे. मागील पावसाळ्यात गावात 512 कोटी 84 लाख लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. यापैकी शेतीसाठी व पिण्यासाठी तसेच बाष्पीभवन, वाहून जाणारे, जमिनीत मुरणारे व अन्य माध्यमातून मिळून 504 कोटी 48 लाख लिटर पाण्याचा वापर गावात होणार आहे व राहिलेले भविष्यात राखून ठेवायचे पाणी 8 कोटी 36 लाख लिटर असणार आहे. नववर्षदिनी गावाने पाण्याचा ताळेबंद मांडण्याची परंपरा यंदाही पाळली व गावातील पाण्याचा हिशेब ग्रामसभेत सादर केला आहे.
लोकसहभागातून गाव विकासाचे हिवरे बाजारचे मॉडेल देशविदेशात प्रसिद्ध आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी मागील 25 वर्षांपासून केलेल्या अथक परिश्रमातून आदर्शगाव हिवरे बाजारने लौकिक मिळवला आहे. या गावाची दरवर्षी 31 डिसेंबरला सायंकाळी ग्रामसभा होते. मागील वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा व नव्या वर्षातील कामाचे नियोजन होते. याच ग्रामसभेत पावसाच्या उपलब्ध होणार्‍या पाण्याचाही हिशेब मांडला जातो. त्यातून गावातील शेतकर्‍यांना उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे सोपे जाते.

पावसानुसार नियोजन
मागील वर्षीच्या पावसाळ्यात गावात 22 दिवस पाऊस झाला व 525 मिलीलिटर पाऊस पडल्याने 512 कोटी 84 लाख लिटर पाणी उपलब्ध झाले. यापैकी बाष्पीभवनात 179 कोटी 49 लाख लिटर, वाहून जाणारे 15 कोटी 89 लाख लिटर, जमिनीत मुरणारे (भूजल) 87 कोटी 18 लाख लिटर, मातीत मुरणारे (मृदा आद्रता) 128 कोटी 21 लाख लिटर, जमिनीवर साठणारे (भूपृष्ठीय पाणी) 51 कोटी 28 लाख लिटर व जलसंंधारणाच्या कामांमुळे मुरणारे अधिकचे पाणी 50 कोटी 78 लाख लिटर धरण्यात आले असून, यामुळे गावाच्या प्रत्यक्ष वापरासाठी 317 कोटी 45 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्यापैकी 309 कोटी 9 हजार लिटर पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी खर्च होणार आहे व 8 कोटी 46 लाख लिटर भविष्यासाठी राखून ठेवले जाणार आहे.

पिकांसह जनावरांचाही विचार
गावची लोकसंख्या व पाळीव जनावरांची संख्या लक्षात घेऊन 5 कोटी 39 लाख 50 हजार लिटर पाणी केवळ पिण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामासाठी 141 कोटी लिचर, रब्बी हंगामासाठी 120 कोटी 35 लाख लिटर, उन्हाळी हंगामासाठी 12 कोटी लिटर (प्रस्तावित) व बारमाहीसाठी 24 कोटी लिटर पाणी आणि इतर वापरासाठी आवश्यक असलेले पाणी 6 कोटी 34 लाख 90 हजार लिटर हिशेबात धरण्यात आले आहे.

COMMENTS