कर्जत : हिंदू धर्माला हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असून तो विश्वातील सर्वात प्राचीन धर्म आहे. याचे अनेक ठोस पुरावे अध्यात्माच्या माध्यमातून आजवर मिळाले आहेत, असे प्रतिपादन राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांनी केले. कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या १८८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाविकांची मोठी गर्दी उपस्थित होती. महादेव महाराज राऊत म्हणाले की, अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. मात्र आज दोन्ही घटक एकमेकांना मान्य करण्यास तयार नसल्याने त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. जर अध्यात्म आणि विज्ञान एकत्र वाटचाल करतील, तर भारत देश विश्वात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलीकडेच परळी परिसरातील डोंगरात सापडलेली अतिप्राचीन विष्णूची मूर्ती हा हिंदू धर्माच्या प्राचीनतेचा ठोस पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि त्या डोंगरात मूर्ती सापडणे, यावरून हिंदू धर्म किती प्राचीन आहे हे सिद्ध होते, असेही त्यांनी नमूद केले. देशावर अनेक परकीय आक्रमणे व संकटे आली, तरी अध्यात्माच्या बळावर हा देश आजही ठामपणे उभा आहे. यामागे विज्ञान व संशोधनाचीही मोठी साथ लाभली आहे, असे सांगत त्यांनी आपल्या धर्मावर टीका इतर धर्मीयांपेक्षा आपल्याच धर्मातील लोक करतात, हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली. कीर्तनातून समाजप्रबोधन करताना त्यांनी संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांत जाऊन त्यांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. १८८ व्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती ही त्यांच्या कार्याची साक्ष आहे, असे ते म्हणाले. या अखंड हरिनाम सप्ताहात राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत : हिंदू धर्माला हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असून तो विश्वातील सर्वात प्राचीन धर्म आहे. याचे अनेक ठोस पुरावे अध्यात्माच्या माध्यमातून आजवर मिळाले आहेत, असे प्रतिपादन राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांनी केले. कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या १८८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाविकांची मोठी गर्दी उपस्थित होती.
महादेव महाराज राऊत म्हणाले की, अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. मात्र आज दोन्ही घटक एकमेकांना मान्य करण्यास तयार नसल्याने त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. जर अध्यात्म आणि विज्ञान एकत्र वाटचाल करतील, तर भारत देश विश्वात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अलीकडेच परळी परिसरातील डोंगरात सापडलेली अतिप्राचीन विष्णूची मूर्ती हा हिंदू धर्माच्या प्राचीनतेचा ठोस पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि त्या डोंगरात मूर्ती सापडणे, यावरून हिंदू धर्म किती प्राचीन आहे हे सिद्ध होते, असेही त्यांनी नमूद केले.
देशावर अनेक परकीय आक्रमणे व संकटे आली, तरी अध्यात्माच्या बळावर हा देश आजही ठामपणे उभा आहे. यामागे विज्ञान व संशोधनाचीही मोठी साथ लाभली आहे, असे सांगत त्यांनी आपल्या धर्मावर टीका इतर धर्मीयांपेक्षा आपल्याच धर्मातील लोक करतात, हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली.
कीर्तनातून समाजप्रबोधन करताना त्यांनी संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांत जाऊन त्यांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. १८८ व्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती ही त्यांच्या कार्याची साक्ष आहे, असे ते म्हणाले. या अखंड हरिनाम सप्ताहात राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS