Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदुत्व भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू – आ. सुरेश धस

जनतेच्या मनात सावरकरांचे स्थान अढळ आहे - राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी - काँग्रेस आणि स्वयंघोषित पुरोगामी मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वारंवार माफिवीर म्हणून आरोप करत त्यांचा अवमान करत आहेत. र

वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या ; सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत

बीड प्रतिनिधी – काँग्रेस आणि स्वयंघोषित पुरोगामी मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वारंवार माफिवीर म्हणून आरोप करत त्यांचा अवमान करत आहेत. राजकारणात स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रखर राष्ट्रभक्त सावरकारांवर आरोप करून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुत्वाचा तिरस्कार करणारे लोक हा खटाटोप करतात. आज भारतीय राजकारणाचा केंद्र बिंदू हिंदुत्व आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वात होत असलेली  नव राष्ट्राची निर्मिती आणि प्रगती विरोधकांना खुपत असून. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठी  राष्ट्रभक्त सावरकरांविषयी संभ्रम अवस्था निर्माण केली जाते. परंतु सावरकरांच्या बहु आयामी व्यक्तिमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. सावरकरांचा इतिहास आणि चरित्र अंतरमुख होऊन पहावे आणि मगच आरोप करावेत असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार सुरेश धस यांनी आम्ही सारे सावरकर स्वातंत्र्यवीर गौरव समारोप यात्रे प्रसंगी केले.

भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या वतीने आज बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा  जवाहर कॉलनी नगररोड  बीड या दरम्यान गौरव यात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरात या यात्रेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी आमदार आदिनाथराव नवले, भाजपा  जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपाचे सर्जेराव तांदळे, नवनाथ अण्णा शिराळे, प्रा. देविदास नागरगोजे,चंद्रकांत फड, अशोक लोढा, डॉ. सुभाष जोशी, डॉ. पिके कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत मुळे,शास्त्री महाराज,  प्रा. बाहेगव्हानकर सर, जगदीश गुरखुदे, विक्रांत हाजारी, चंद्रकांत नवले, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, किरण बांगर, बालाजी पवार प्रा. चौधरी सर,  या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रा. बाहेगव्हानकर सर, डॉ. सुभाष जोशी, यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.     याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुरेश नवले म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू संकल्पक आणि व्यापक हिंदुत्वादी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते.  स्वातंत्र्य लढ्यातील सावरकर आणि त्यांचे कुटुंबाचे  काम आणि त्याग अतुलनीय आहे. सावरकरांविषयी बेछुट वक्तव्य करणे चुकीचे आहे. निंदकामुळे सावरकरांच्या विचाराची पालखी वाहण्याची संधी आज स्वातंत्र्य प्रेमींना मिळत आहे. ज्यांनी राष्ट्रभक्तीचा अविष्कार या मातीत रुजवला अशा राष्ट्रभक्तावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी लाखो गौरव यात्रा काढण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक सज्ज आहेत. मनोगत व्यक्त करताना राजेंद्र मस्के म्हणाले की, भारत देश हा हिंदुराष्ट्र व्हावे हा सावरकरांचा ध्यास होता.दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा मिळालेले स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशानी क्रूरतने मरण मरणयातना दिल्या. हिंदुत्व विरोधी राजकारण करणारे काँग्रेस मंडळी कायम सावरकरांविषयी द्वेष व्यक्त करत आले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे मंत्री मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता. त्यावेळी हिंदुहृदय सम्राट बलासाहेन ठाकरे यांनी जोडे मारो आंदोलन करून, समाचार घेतला होता.

आज पुन्हा त्याच द्वेष भावनेतून काँग्रेस सावरकरांना बदनाम करत आहे. ही बाब निंदनीय आहे. सावरकरांचा सन्मान राखण्यासाठीच आजची ही गौरव यात्रा सावरकर प्रेमी नागरिक आणि भाजपा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आली आहे. कुंडलिक खांडे – सावरकर हिंदू धर्म रक्षक होते. हिंदूंना जागरूक करण्याचे काम त्यांनी केले. स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला, तुरुंगात असताना अनेक काव्याची निर्मित्त केली. अशिक्षित कैद्यांना शिक्षण दिले. इतर कैद्याप्रमानेच त्यांनी कारागृह मुक्तीसाठी पत्र व्यवहार केला. यात गैर काही नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम काँग्रेस करत आहे. यावेळी कपिल सौदा, नागेश पवार, विलास बामणे, संगीताताई धसे, शीतलताई  राजपूत, छायाताई मिसाळ, संजीवनी राऊत, सुनील मिसाळ, सोमनाथराव माने, रवींद्र गंगावणे, हरीश खाडे, गणेश उगलें शिवाजी जाधव, विष्णू म. सुरवसे, बापू जाधव, गजानन फाटे, नाना शिंदे, वसंत गुंदेकर, सुरेश माने, गणेश वाणी, लक्ष्मण थोरात, तुकाराम गायकवाड,

COMMENTS