Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकल हिंदू समाजातर्फे ’हिंदू गर्जना’ भव्य मोर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : लव्ह जिहाद विरोधी कायदा, धर्मांतरण बंदी, गोहत्या बंदी कायदा, उरूण ईश्‍वरपूर नामकरण, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस ध

कराड आगारातील चालकाचा हृदय विकाराने मृत्यू
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप
त्र्यंबकेश्‍वरला आजपासून व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद

इस्लामपूर / प्रतिनिधी : लव्ह जिहाद विरोधी कायदा, धर्मांतरण बंदी, गोहत्या बंदी कायदा, उरूण ईश्‍वरपूर नामकरण, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस धर्मवीर दिन घोषित करावा. या प्रमुख मागण्यासाठी वाळवा तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना भव्य मोर्चा काढण्यात आला. महिला अग्रभागी होत्या. इतर विविध पक्षांचे नेते पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगव्या टोप्या व फेटे, भगवे झेंडे यामुळे तहसीलदार कार्यालय चौकात भगवे वादळ निर्माण झाले होते.
महाराष्ट्रासह देशभर हिंदू गर्जना मोर्चे निघाले. त्या पार्श्‍वभूमीवर हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्‍या इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता ईश्‍वरपूर येथील वाळवा तालुका क्रिडागणांवर हजारो हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 10.30 वाजता मोर्चाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, ब्राम्हणपुरी, गणेश मंडई, यल्लामा चौकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज आश्‍वारुढ पुतळा येथे मोर्चाने धडक दिली. भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय अशा घोषणा देण्यात आल्या. हिंदु समाजाला व हिंदु संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न अनेक दिवसापासून होत आहे. हिंदु भगिनींच्या असुरक्षितेत वाढ होत चालली आहे. भगिनींना धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. अत्यंत क्रूरपणे अनेक भगिनींचे जीव घेतले जात आहेत. गोहत्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अत्यंत दुर्दैवी व भारतीय संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न आहे. आजची भयानकता पाहता व भविष्यातील वाढती चिंता पाहता हिंदू गर्जना मोर्चा काढुन जनजागृती संपुर्ण महाराष्ट्र व देशभर करण्यासाठी हिंदू बांधव एकत्र येत आहेत. देशामध्ये वाढत्या विकृती व घातक विचाराला कायमस्वरूपी लगाम बसावा. हिंदु संस्कृती, हिंदु धर्म सुरक्षित रहावा. त्याला कोणी धक्का लावत असतील तर या विचारा विरुध्द कडक कायदे व्हावेत, हा विचार हिंदु गर्जना मोर्चाचा आहे. हिंदु भगिनींच्या मनोगतानंतर समारोप करण्यात आला.
यावेळी नम्रता वाळवेकर, स्वागता मोहिते, वैष्णवी मोरे, सायली पाटील यांनी मनोगत केले. विक्रम पावसकर, संजय भागवत, निशिकांत पाटील, आनंदराव पवार, राहुल महाडीक, सम्राट महाडीक, गौरव नायकवडी, वैभव पवार, धैर्यशील मोरे, मधुकर हुबाले, अशोक खोत, सतिश महाडीक, कपिल ओसवाल, सुजित थोरात, प्रविण परीट, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत, अजित पाटील, अक्षय पाटील, राजेश मंत्री, दिनानाथ लाड, रमेश शेटे, राजेश मंत्री, अनंता दिक्षित, सुयश पाटील, विकास परीट, अमोल ठाणेकर, सोमनाथ फल्ले, गजानन फल्ले, तुझर भुतकर, सुरज पाटील, विश्‍वजीत पाटील, सुनिता निशिकांत पाटील, वंदना थोरात, सुरेखा जगताप, जयश्री रणदिवे, शोभा जगताप, स्मिता पवार, निता कदम यांच्यासह हजारो हिंदू बांधव-भगिनी उपस्थित होते.

COMMENTS