Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदी राष्ट्रभाषा नाही, राज्य सरकारने केली दुरुस्ती

मुंबई/प्रतिनिधी ः हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्याचा राज्यसरकारचा अध्यादेश समोर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल मंजूर; निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश
आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी
धारूर घाटात अपघाताची मलिका सुरुच एकाच वेळी सहा वाहने एकमेकांना धडकली

मुंबई/प्रतिनिधी ः हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्याचा राज्यसरकारचा अध्यादेश समोर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र राज्य सरकारने गुरुवारी यासंदर्भात दुरुस्ती केली. राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुनर्रचनेचा सुधारित शासकीय अध्यादेश काढून सांस्कृतिक विभागाने चूक सुधारली आहे.
देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला होता. राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली असून, त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले होते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यासाठीच्या अध्यादेशामध्ये ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे’, असे नमूद करण्यात आले होते. शासकीय अध्यादेशामध्ये हिंदीला राष्ट्रभाषा जाहीर करण्याच्या धोरणाविरोधात सर्वच स्तरांतून टीका झाली होती. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल शिदोरे यांनी टीका केली होती. त्याची दखल घेत सांस्कृतिक विभागाने ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने’ हा शब्दप्रयोग वगळून सुधारित अध्यादेश काढला आहे.

COMMENTS