Homeताज्या बातम्या

हिंद दी चादर’ सोहळ्यात खा. डॉ. गोपछडे यांनी केली जुता घर सह विविध सेवा

नांदेड ःहिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर आजपासून जागतिक सोहळ्याला मोठ्या

जनतेच्या विश्‍वासाला साजेसे काम करा : खा. अशोकराव चव्हाण
Nanded : देगलूर स्वच्छतेचा जागर ग्रुपला स्वच्छता मोहीम सुरू करून सात वर्षे पूर्ण (Video)
भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज

नांदेड ःहिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर आजपासून जागतिक सोहळ्याला मोठ्या श्रद्धा युक्त वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जुता घर, लंगर सेवा सह अनेक ठिकाणी भाविकांची मनोभावे सेवा केली.
हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमास आज सकाळपासूनच सुरुवात झाली. मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविक, साध संगत  शिस्त, शांतता व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा – आस्था व मानवता संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता समरसता व एकतेचा संदेश पोहोचत आहे. या जागतिक स्तरावरील सोहळ्यात आलेल्या भाविकांची सेवा करण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. कार्यक्रमासाठी येणार्‍या भाविकांच्या सेवेसाठी  खा. डॉ. गोपछडे जुता घर येथे सेवा केली. भाविकांची पादत्राणे आपल्या हाताने उचलून जमा केले. त्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी भाविकांसाठी लंगतमध्ये सेवा दिली. स्वच्छता राखण्यासाठी हातात झाडू घेऊन झाडू  मारून स्वच्छता केली व आरोग्य कॅम्पमध्ये जाऊन रुग्ण सेवा केली.  खा. डॉ. गोपछडे यांनी नांदेड वासियांसह देश विदेशातून सेवाभाव जपणार्‍या भाविकांची सेवा पाहून थक्क झाले आणि त्यांचे

COMMENTS