Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली मेट्रोमध्ये हायवोल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडने धु धु धुतलं

दिल्ली - काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो चर्चेत आहे ती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे. दिल्लीच्या मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर ?
तुम्हाला कायदा राबवण्यासाठी निवडून दिले तो राबवा ,आरत्या काय करत बसलात

दिल्ली – काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो चर्चेत आहे ती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे. दिल्लीच्या मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोणी मेट्रोमध्ये अंघोळ करतंय, तर कोणी गोधडी घेऊन झोपतंय. त्यामुळे दिल्ली मेट्रोमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमधील कपलच्या किसिंगचा व्हिडिओ ट्रेंड होताना दिसत होता. अशातच आता आणखी एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ रोमांटिक नसून भांडणाचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय.दिल्ली मेट्रोमधील लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होतं आणि नंतर हे प्रकरण हाणामारीवर पोहोचतं. दोघांमधील वाद कधी हाणामारीवर पोहोचतं कळलं देखील नाही. भांड्याला भांड लागतंच असं आपण म्हणतो. परंतू हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. ही घटना मेट्रोमधील एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर व्हिडिओ तुफान ट्रेंडमध्ये आल्याचं दिसतंय.व्हिडिओमध्ये हे प्रेमी युगल मेट्रो ट्रेनच्या आत गेटजवळ उभे असल्याचं दिसतंय. दोघांमध्ये काही बोलणे होते आणि तेव्हाच मुलगी त्या मुलाला थप्पड़ मारते. माझ्याशी बोलू नकोस, असं मुलगी म्हणाताना दिसतीये आणि गप्प बसण्यास सांगते. काही वेळाने दोघंही लांब उभं राहतात आणि मेट्रो ट्रेनचे दरवाजे उघडतात आणि दोघे बाहेर पडतात.दरम्यान, प्रेमात भांडणं होत असतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी भांडणं करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हारयल होत असतात. काही लोकांनी ट्विट करून ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ ला अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची विनंती केली आहे. अशा प्रकरणावर दिल्ली पोलिस पाऊलं उचलत असल्याचं दिसतंय.

COMMENTS