Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

तीन मुलींची सुटका ः पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाची कारवाई

शिर्डी प्रतिनिधी ः शिर्डीचे पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की, शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहारमध्ये एका

पंकजा मुंडे समर्थक मुकूंद गर्जे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ
बोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार

शिर्डी प्रतिनिधी ः शिर्डीचे पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की, शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहारमध्ये एका इसमाने वेश्या व्यवसायाकरिता तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समजले. त्यानंतर वमने यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत कारवाई केली. यावेळी तीन मुलींची सुटका देेखील करण्यात आली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पोलिस उपाधीक्षक वमने यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश केल्याने पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठविले. तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता. त्या व्यक्तीने त्याचे हॉटेलमधील मुली दाखवून  बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली. पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होताच हॉटेल साई वसंत विहार येथे छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले आणि वेश्याव्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने (वय 27) रास.ज्ञक्ष कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यास ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे. वरील दोन्ही आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोषूस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर  404/2024 स्त्रिंया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे दाखल करण्यात करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली, शिर्डीचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय कायदे, हेकॉ इरफान शेख, हेकॉ अशोक शिंदे, हे कॉ दत्ता तेलोरे, कॉ बाबा खेडकर, गणेश घुले, श्याम जाधव, सविता भांगरे, पवार चालक, गोलवड, ज्ञानेश्‍वर गांगुर्डे उपस्थित होते.

COMMENTS