Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई ः कॉर्डेलिया कु्रझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीदरम्यान अधिकारी समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी छापा टाकला होता. त्यावेळी अभिनेता शाह

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला… नवाब मलिक भडकले… (Video)

मुंबई ः कॉर्डेलिया कु्रझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीदरम्यान अधिकारी समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी छापा टाकला होता. त्यावेळी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान 26 दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद होता. यानंतर आर्यनला जामीन मिळाला. आर्यन खानला सोडण्याप्रकरणी शाहरूख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडेंवर आहे. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची 15 फेब्रुवारीपर्यंत अटक टळली. वानखेडेंनी कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सीबीआयने दाखल केलेला खंडणीचा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी हायकोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालाने समीर वानखेडेंना 15 फेब्रुवारीपर्यंत दिलासा कायम ठेवला. सीबीआयतर्फे एएसजी बाजू मांडणार आहेत.

COMMENTS