गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज, बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाल्याची घटना घडली. यानंतर महाराष्
गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज, बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाल्याची घटना घडली. यानंतर महाराष्ट्रात पोलिस अधीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यामधील पोलिस मदत केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरमध्ये बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झालेत. यामध्ये 10 डिस्ट्रीक रिझर्व्ह फोर्सचे (डीआरजी) जवानांचा समावेश असून एक वाहन चालक देखील शहीद झालाय. शहीद झालेल्या जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल जोगा सोधी, मुन्ना राम कडती, संतोष तमो, डुलगो मांडवी, लखमू मरकाम, जोगा कावासी, हरिराम मांडवी, राजू राम कर्तम, जयराम पोडियम, जगदीश कावासी आणि वाहन चालक धनीराम यादव यिांचा समावेश आहे. हा हल्ला नेमका नक्षल्यांच्या कोणत्या गटाने केला याबाबत अधिकृत माहिती पुढे आली नसली तरी या घटनेत नक्षलवाद्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील पश्चिम सब झोनल ब्युरोचा हात असण्याची शकत्या वर्तवण्यात आलीय. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिक सतर्क आहेत. तसेही एखाद्या राज्यात हिंसाचार घडवल्यानंतर जंगलमार्गे दुसर्या राज्यात पळ काढण्याची नक्षलवाद्याची सवय आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह ओडिसामध्येही पोलिसांना सतर्कतेची सूचना देण्यात आलीय. छत्तीसगड सीमेवरील ओडिशाच्या मलकानगिरी, नवरंगपूर, कोरापूट, वरगड आणि नुआपडा अशा 5 जिल्ह्यांमध्ये पोलिस सज्ज आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्रातील नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमा परिसरात सी-60 जवानांना अतिदक्ष राहण्याची सूचना करण्यात आलीय. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्रात पोलिस सतर्क असून कारवाईसाठी सज्ज आहेत.
COMMENTS