Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत

नाशिक - गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपास

रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन
रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

नाशिक – गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.  नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दहाव्या फेरीअंती तब्बल  94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे. राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस 10752 मतांची आघाडी घेतली होती. 

COMMENTS