Homeताज्या बातम्यामनोरंजन

हेमा मालिनी यांनी गदर 2 चे केले कौतुक

मुंबई प्रतिनिधी - गदर २'ची सध्या बॉक्स ऑफिसवर हवा आहे. या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या गदर

मोपलवार म्हणजे सत्ता-प्रशासानाचा नेक्सस !
दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना हत्यारासह पकडले
सीबीएसई शाळांना बोगस ना हरकत प्रमाणपत्रांची विक्री

मुंबई प्रतिनिधी – गदर २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर हवा आहे. या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेमकथा या चित्रपटाच्या सिक्वेलवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. सनी देओलच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, त्याचबरोबर त्याचे कुटुंबीय देखील चित्रपट पाहिल्यानंतर सनीचे कौतुक करत आहेत. ‘गदर २’च्या प्रीमियरला सनी देओलचा भाऊ बॉबी देओल आणि त्याच्या सावत्र बहिणी आणि हेमा मालिनी यांच्या मुली ईशा, आहाना देखील उपस्थित होत्या. सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांनीही नुकताच ‘गदर २’ चित्रपट पहिला. त्या चित्रपट पाहून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांना घेरलं. यावेळी हेमा मालिनी यांनी चित्रपटाविषयी आणि कलाकारांच्या अभिनयाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या.

गदर २ चित्रपट हेमा मालिनी यांना खुपच आवडला असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. चित्रपटाविषयी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, मी नुकतीच गदर २ पाहून आले आहे. चित्रपट खूप सुंदर आहे. चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. प्रेक्षक देखील चित्रपटाचा आनंद घेत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर मला पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेल्यासारखं वाटलं. अनिल शर्मा जी यांनी खुपच उत्तम दिग्दर्शन केलयं. सनीनेही खुपच छान अभिनय केला आहे. उत्कर्ष शर्मा आणि सिमरत यांनी देखील छान काम केलं आहे.

COMMENTS