Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून 

अहमदनगर :  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून परप्रांतीय तरुणाचा डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना काटवन खंडोबा आगरकर मळ्याकडे जा

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे होणार प्रशिक्षण
संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका
कोपरगाव शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी  

अहमदनगर :  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून परप्रांतीय तरुणाचा डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना काटवन खंडोबा आगरकर मळ्याकडे जाणाऱ्या रोडवर, शेती सर्वे नंबर 4/2 मध्ये असलेल्या पत्राच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेत येथे घडली. या बाबतची माहिती अशी की काटवन खंडोबा आगरकर मळ्याकडे जाणा-या रोडवर शेती सर्वे नंबर चाहुराणा खुर्द 4/2 मध्ये असलेल्या पत्रा खोलीसमोर मोकळ्या जागेत अशोक कुमार अमरजित (रा.बसौली बु पोस्ट बासगाव जि. गोरखपुर उत्तर प्रदेश ) याचे  प्रमोद दिपचंद विश्वकर्मा (रा.बांकी, शेजवाडा जि. छिंदवाडा मध्यप्रदेश ) याचेशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते .त्या वादाचा मनात राग धरून प्रमोद विश्वकर्मा याने हातात दगड घेवुन अशोककुमार अमरजीत याचे डोक्यात दगडाने दोन तीन वेळेस मारुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद विश्वकर्मा यास कोतवाली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी  विश्वास रंगनाथ डांगे राहणार ढोर गल्ली अमन पाटील रोड माळीवाडा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद विश्वकर्मा याचे विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 302 अन्वये खूनाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहेत

COMMENTS