थेट उद्धव ठाकरे यांच्या शक्तीस्थळावर प्रहार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थेट उद्धव ठाकरे यांच्या शक्तीस्थळावर प्रहार

संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात महाविकास आघाडीकडून भाजप नेत्यांच्या चौकशीला वेग दिल्यानंतर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्या कारवायांचा वेग वाढवला अ

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप
प्रियंका शिंदे यांना महिला लिडर बिझनेस पुरस्कार
रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात महाविकास आघाडीकडून भाजप नेत्यांच्या चौकशीला वेग दिल्यानंतर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्या कारवायांचा वेग वाढवला असून, मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीत राऊत यांच्या राहत्या घरासह अलिबाग येथील 8 जमिनीच्या प्लॉटचा समावेश आहे. ईडीच्या कारवाईमुळे हा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ईडीने अलिबागमधील राऊत यांच्या मालकीचे 8 भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट जप्त केलाय. ही संपत्ती राऊत यांनी मनी लाँड्रिंगच्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे. दरम्यान राऊत यांच्या नातेवाईकांवरही ईडीने कारवाई केल्याची माहिती पुढे आलीय. मुंबईतील 1034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच पार्श्‍वभूमीवर ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईनंतर संजय राऊतांनी असत्यमेव जयते असे ट्वीट केले आहे. 1038 कोटी रुपयांचा घोटाळा याचा प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीने संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असे किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत तपास यंत्रणांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यापेक्षा शिवसेना नेत्यावर ईडीची कारवाई करण्याचा वेग वाढवला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त केल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर कारवाई करत, तपास यंत्रणांनी आपले पुढील टार्गेट मातोश्री असल्याचे स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे.

आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : राऊत
अंमलबजावणी संचालनालयाकडून शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राऊत यांनी आव्हान दिली आहे. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन, असे प्रतिआव्हान राऊत यांनी दिले आहे. तसेच ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझे कुटुंब राहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजकीय सूडापोटी कारवाई केली असल्याचेही ते म्हणालेत. इतकेच काय तर माझे घर जप्त केल्याने भाजपला आनंद झाला आहे, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला आहे. आमच्या कष्टातून आम्ही घर घेतले असल्याचेही राऊत सांगायला विसरले नाहीत.

उद्धव ठाकरे यांच्या शक्तीस्थळावर प्रहार
आगामी काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली असतांनाच, राज्यात तपास यंत्रणांचे छापे वाढले आहेत. त्यात थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शक्तीस्थळावर प्रहार करण्यास भाजपने सुरूवात केल्याचे या तपास यंत्रणांच्या माध्यमातून दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून ईडीने आपला मोर्चा फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार थेट पाडण्यासाठी कोणताच मार्ग भाजपला दिसत नसल्याने ईडीच्या माध्यमातून सरकारवरील दबाव दिवसागणिक वाढेल याची काळजी घेतल्याचे दिसून येते. येत्या मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत शिवसेना होईल तितकी बदनाम तपास यंत्रणांचा वापर करून करायची असा डावही भाजपचा स्पष्ट दिसून येत आहे.

COMMENTS