राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात 2 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी मान्सूनपूर्व पावसानेेेे महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. ब

चंद्रपूरमध्ये मजुरांच्या बसचा भीषण अपघात
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची दारे खुली केली – आ.संदीप क्षीरसागर
जिल्हा परिषदेच्या निधी नियोजनाच्या हालचाली सुरू

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात 2 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी मान्सूनपूर्व पावसानेेेे महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. बुधवारी विदर्भात आणि मुंबईसह कोकणच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट तीव्र आहे. अशातच गेल्या काही दिवसात राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या तीन-चार दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबईसह 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, विदर्भ आणि खान्देशच्या काही भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी 3/4 दिवसात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसापासून बंगालच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून अनुकूल स्थिती अभावी पुढे सरकू शकला नाही. दरम्यान, यंदा मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा म्हणजेच 15 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर पोहचला असून केरळात 27 मे रोजी मान्सून दाखल होईल. त्यानंतर 6 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 26 मे पर्यंत दक्षिण कोकणसह राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 26 मे नंतर कोकण आणि किनारपट्टीसह संपूर्ण राज्यात जोरदार मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 2 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

COMMENTS